Netflix- Indrani Mukerjea and Bombay HC: इंद्राणी मुखर्जी वरील वेब सीरीजचं रीलीज मुंबई उच्च न्यायालयाने रोखलं; स्क्रिनिंगपूर्वी CBI ला दाखवण्याचे आदेश
‘The Indrani Mukerjea Story: The Buried Truth' उद्या नेटफ्लिक्स वर प्रदर्शित करण्यावर सध्या मुंबई उच्च न्यायालयाने रोखलं आहे.
Netflix च्या इंद्राणी मुखर्जी वरील ' द इंद्राणी मुखर्जी स्टोरी- बरीड ट्रूथ' वेब सीरीज वर मुंबई उच्च न्यायालयाने तात्पूर्ती बंदी घातली आहे. उद्या (23 फेब्रुवारी) या वेब सीरीजचे स्क्रिनिंग केले जाणार नाही. या सीरीजचं आधी सीबीआय अधिकार्यांसमोर स्क्रिनिंग करा असे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी 29 फेब्रुवारी दिवशी आहे. सीबीआयच्या दाव्यानुसार या सीरीजचा प्रकरणाच्या तपासावर प्रभाव होऊ शकतो. लोकांच्या मनातही गैरसमज निर्माण होऊ शकतात. दरम्यान इंद्राणी मुखर्जी ही शीना बोरा मर्डर केस मधील आरोपी असून सध्या ती जामीनावर बाहेर आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement