12th Fail Teaser Release: 12 वी फेल चित्रपटाचा टीझर आऊट,सत्य कहाणीवर आधारित चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

विदू चोप्रा दिग्दर्शित १२ वी फेल चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सत्य कहाणीवर आधारित आहे.

12 vi fail Movie Pc insta

12th Fail Teaser Release: लवकरच 12 वी फेल (12th Fail) हा आगामी चित्रपट चित्रपरटगृहात प्रदर्शित होणार आहे. विधू विनोद चोप्रा यांचा आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. हा चित्रपट अनुराग पाठक याचा नावाच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादबंरीवर आधारित आहे. विद्यार्थांच्या जीवना आधारित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तरुण पिढीच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करणाऱ्यांवर हा चित्रपट बनवला गेला आहे.  12 वी फेल (12th Fail Teaser) हा चित्रपट UPSC ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांवर आधारित आहे. UPSC विद्यार्थ्यांचे जीवन,त्यांची जिद्द, कठोर परिश्रम आणि त्यांच्यातील घनिष्ठ मैत्री दर्शवतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

विदू चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शन केला आहे. यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांनी पंसती दाखवली आहे. अवघ्या काही तासांत या चित्रपटाच्या टीझरला 12 मिलियन व्ह्यूज आले आहे. हा चित्रपट संपुर्ण दिल्लीत शुट करण्यात आले आहे.दिल्लीत नागरी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांसोबत या चित्रपटाचे शुट करण्यात आले आहे. हा चित्रपट देशभरात हिंदी, तेलगु, तमिळ, मल्याळमध्ये भाषेत प्रदर्शित होणार आहे. २७ ऑक्टोबर रोजी चित्रपट चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now