The Kerala Story: उच्च न्यायालयाने फेटाळून लावली 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका

याआधी सुप्रीम कोर्ट आणि केरळ हायकोर्ट यांनी अशा याचिकांमध्ये चित्रपट आणि त्याच्या निर्मात्यांविरूद्ध कोणतेही प्रतिबंधात्मक आदेश देण्यास नकार दिला होता.

The Kerala Story (Photo Credit: Youtube)

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एडी जगदीश चंडीरा आणि सी सरवणन यांच्या उन्हाळी सुट्टीतील खंडपीठाने गुरुवारी वादग्रस्त बहुभाषिक चित्रपट 'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. याआधी सुप्रीम कोर्ट आणि केरळ हायकोर्ट यांनी अशा याचिकांमध्ये चित्रपट आणि त्याच्या निर्मात्यांविरूद्ध कोणतेही प्रतिबंधात्मक आदेश देण्यास नकार दिला होता. टेलिव्हिजन पत्रकार म्हणून काम करणार्‍या एका याचिकाकर्त्याने केरळमधील 32,000 हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना इस्लाममध्ये धर्मांतरित करून इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यास प्रवृत्त केल्याचा निराधार दावा केलेल्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मनिथनेय मक्कल काची नेते आणि आमदार एमएच जवाहिरुल्ला यांनी तामिळनाडूमध्ये चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: आळंदी येथे ‘The Kerala Story' पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांना मिळणार मोफत ऑटो सेवा; रिक्षा चालकाचा फोटो व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)