Singham Again Poster: रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' मधील रणवीरचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज, पाहा पोस्टर
या चित्रपटातील मुख्य कलाकारांचे पोस्टर रिलीज होत आहे.
Singham Again Poster: रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकारांचे पोस्टर रिलीज होत आहे. आता या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टर मधून नसून ऊर्जा भांडार सिम्बा म्हणजेच रणवीर सिंग झळकला आहे. प्रेक्षकांना सिम्बाला पाहण्याची आतुरता लागली होती. रणवीर पोलिसांच्या वर्दीत गॉगल घातलेला दिसत आहे. तसेच, त्याच्या मागे हनुमानजींची मूर्ती दिसते. सिंघम अगेन हा अजय देवगण स्टारर सिंघम या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफसारखे कलाकार कॅमिओमध्ये दिसणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)