Shah Rukh Khan Greets Devoted Fan: शाहरुख खानच्या जबरा चाहत्याची इच्छा पूर्ण; 95 दिवस 'मन्नत'बाहेर थांबलेल्या व्यक्तीची किंग खानने घेतली भेट

आता या डाय हार्ड फॅन मोहम्मद अन्सारीचा शाहरुख खानसोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shah Rukh Khan With His Fan (Photo Credits:X/SRK Universe)

Shah Rukh Khan Greets Devoted Fan: शाहरुख खानची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. यामध्ये स्थानिक आणि परदेशी चाहत्यांचा समावेश आहे. जगभरात शाहरुख खानची क्रेझ पाहायला मिळत आहे. गेल्या 2 नोव्हेंबरला शाहरुख खानचा 59 वा वाढदिवस होता, तिथे खुल्या आकाशाखाली शाहरुख खानचे स्टारडम पाहायला मिळाले. शाहरुख खानचे चाहते मन्नतच्या घराबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर होते. यामध्ये एक चाहता असाही होता जो गेल्या 95 दिवसांपासून त्याचा सर्वात आवडता अभिनेता शाहरुख खानला भेटण्याची वाट पाहत होता. झारखंडहून मुंबईत पोहोचलेल्या या चाहत्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आणि त्याला शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळाली. आता या डाय हार्ड फॅन मोहम्मद अन्सारीचा शाहरुख खानसोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानचा हा झारखंडी चाहता गेल्या 94 दिवसांपासून मन्नतच्या बाहेर 'किंग खान'ची झलक पाहण्याची वाट पाहत होता आणि शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी मोहम्मद अन्सारीला त्याच्या आवडत्या स्टारची झलक पाहायला मिळाली. यासह त्याची शाहरुख खानशी भेटही झाली. (हेही वाचा: SRK Quits Smoking: एकेकाळी 100 सिगारेट्स पिणार्‍या Shah Rukh Khan ने धुम्रपानाची सवय सोडल्याची दिली कबुली)

शाहरुख खानने घेतली त्याच्या चाहत्याची भेट: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif