Shamshera Teaser: रणबीर कपूरच्या 'शमशेरा'चा टीझर प्रदर्शित, संजय दत्त आणि वाणी कपूरही मुख्य भूमिकेत

चाहते रणबीरच्या शमशेरा या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये संजय दत्त पहिल्यांदा दाखवण्यात आला असून तो शमशेराची ओळख देताना दिसत आहे.

Shamshera Teaser:  रणबीर कपूरच्या 'शमशेरा'चा टीझर प्रदर्शित, संजय दत्त आणि वाणी कपूरही मुख्य भूमिकेत
Shamshera (Photo Credit - Twitter)

रणबीर कपूर स्टारर 'शमशेरा' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. चाहते रणबीरच्या शमशेरा या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये संजय दत्त पहिल्यांदा दाखवण्यात आला असून तो शमशेराची ओळख देताना दिसत आहे. त्याचवेळी या टीझरमध्ये वाणी कपूरही दिसत असून ती शमशेराबद्दल बोलत आहे. यानंतर रणबीर कपूर देखील अंधारात बसून शमशेराबद्दल प्रेक्षकांशी बोलतांना दिसतो आहे. हा चित्रपट 22 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 11, 2022 12:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).