Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरात सासु-सुनेचा वाद शिगेला, नवाजुद्दीनच्या आईने केली सुनेविरुध्द पोलिसात तक्रार

नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी अभिनेत्याची पत्नी जैनब विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Nawazuddin Siddiqui (Photo Credits: Instagram)

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी अभिनेत्याची पत्नी जैनब विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तरी मेहरुनिसा सिद्दीकीच्या तक्रारी नंतर पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी जैनब सिद्दीकीला चौकशीसाठी बोलावले आहे. तरी जैनबने देखील नवाजुद्दीनच्या आई मेहरुनिसा यांच्या बरोबर वाद झाल्याचा आरोप केला आहे. आलिया ही नवाजुद्दीन यांची दुसरी पत्नी असुन नवाजुद्दीन, नवाजुद्दीनची आई आणि झैनब  यांच्यात मालमत्तेचा वाद आहे. आयपीसी 452, 323, 504 आणि 506 नुसार नवाजुद्दीनची पत्नी जैनब विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी वर्सोवा पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now