Kaam Chalu Hai Trailer: बहुप्रतिक्षीत 'काम चालू है' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेता राजपाल यादव याचा आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉच रिलीज झाला आहे. काम चालू है या चित्रपटात मुख्य भुमिकेत अभिनेता राजपाल यादव दिसणार आहे
Kaam Chalu Hai Trailer: बॉलिवूड चित्रपटातील अभिनेता राजपाल यादव याचा आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉच रिलीज झाला आहे. काम चालू है या चित्रपटात मुख्य भुमिकेत अभिनेता राजपाल यादव दिसणार आहे. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, राजपाल यादव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपल्या मुलीला गमावतो, ज्याच्या विरोधात तो प्रशासनाशी लढतो आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम करतो. चित्रपटात राजपाल यादव यांच्या सोबत जिया मानेक आणि कुरंगी नागराज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन पलाश मुच्छाळ यांनी केले आहे. बेसलाइन स्टुडिओ आणि पाल म्युझिक अँड फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. सर्वांना व्याकुळ करणारं असा चित्रपटाचा ट्रेलर आहे. (हेही वाचा- लव्ह यू शंकर' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच)