IC 814- The Kandahar Hijack: वेब सिरीज 'IC-814 द कंदहार हायजॅक'मध्ये जोडली जाणार अपहरणकर्त्यांची खरी नावे; जनतेच्या रोषापुढे Netflix झुकले
मात्र ही सिरीज रिलीज झाल्यावर अनेक लोकांनी आरोप केला की, सिरीजच्या निर्मात्यांनी यातील दोन अपहरणकर्त्यांची नावे बदलली आहेत.
कंदाहार हायजॅकवरील नवीन वेब सिरीज 'IC 814 - The Kandahar Hijack' संदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, नेटफ्लिक्सने एक निवेदन जारी केले आहे. आता विमान अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांची खरी नावेही सिरीजच्या डिस्क्लेमरमध्ये लिहिली जाणार आहेत. नेटफ्लिक्सने भारत सरकारच्या अधिका-यांच्या भेटीनंतर हा निर्णय घेतला आहे. या मालिकेबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांना समन्स बजावले होते. या बैठकीनंतर नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘1999 च्या इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 814 च्या अपहरणाशी परिचित नसलेल्या दर्शकांच्या फायद्यासाठी, आम्ही अपहरणकर्त्यांची खरी आणि कोड नावे सुरुवातीच्या डिस्क्लेमरमध्ये जोडली आहेत.’
त्यानंतर याबाबतचा वाढू लागला. त्यानंतर नेटफ्लिक्सची कंटेंट हेड मोनिका शेरगिलला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने समन्स बजावले. देशातील जनतेच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे मंत्रालयाने 2 सप्टेंबर रोजी म्हटले होते. भारताच्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा आदर नेहमीच आहे. काहीही चुकीचे दाखवण्यापूर्वी विचार करायला हवा. याबाबत सरकार अत्यंत कडक आहे, असा इशारा सरकारने नेटफ्लिक्सला दिला होता. (हेही वाचा: Emergency Release Date Postponed: कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलले)
वेब सिरीज 'IC-814 द कंदहार हायजॅक'मध्ये जोडली जाणार अपहरणकर्त्यांची खरी नावे-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)