चाहता असावा तर असा! Mika Singh ला पाकिस्तानी व्यक्तीने दिल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू; रोलेक्स घड्याळ आणि हिऱ्याची अंगठी, सोन्याच्या चेनचा समावेश (Video)

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मिका प्रेक्षकांच्या गर्दीसमोर स्टेजवर परफॉर्म करत आहे. त्याचवेळी एक पाकिस्तानी चाहता स्टेजवर येऊन मिका सिंगला महागडे गिफ्ट देतो.

Mika Singh (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड आणि पंजाबी गायक मिका त्याच्या हिट गाण्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मिका सिंगने अनेक ब्लॉकबस्टर गाणी दिली आहेत. सध्या मिका अमेरिकेत कॉन्सर्ट करत आहे. मिकाच्या अमेरिका दौऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये एका पाकिस्तानी चाहत्याने मिकावर कोट्यावधींच्या भेटवस्तूंचा वर्षाव केला. या पाकिस्तानी चाहत्याने मिका सिंगला दिलेल्या गिफ्ट्स पाहून तिथे उपस्थित सगळेच हैराण झाले. पाकिस्तानी चाहत्याने मिकाला रोलेक्स घड्याळ भेट म्हणून दिले, ज्याची किंमत 3 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याने गायकाला हिऱ्याची अंगठी आणि जाड सोन्याची चेन भेट दिली. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मिका प्रेक्षकांच्या गर्दीसमोर स्टेजवर परफॉर्म करत आहे. त्याचवेळी एक पाकिस्तानी चाहता स्टेजवर येऊन मिका सिंगला महागडे गिफ्ट देतो. खुद्द मिकालाही काही काळ समजू शकले नाही की काय होत आहे ते. हा चाहता मिका सिंगला आधी सोन्याची चेन घालायला लावतो. मग तो त्याला हिऱ्याची अंगठी घालायला लावतो. नंतर तो रोलेक्स घड्याळही भेट देतो. हे सर्व पाहून मिका चकित झाला आणि परफॉर्म करत राहिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोलेक्स घड्याळाची किंमत 3 कोटी रुपये आहे. मिकाला भेटवस्तू दिलेल्या चेन आणि अंगठ्याची किंमतही कोट्यावधी रुपये आहे. (हेही वाचा: Shah Rukh Khan Death Threat: शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; आरोपी वकिलाच्या पोलीस कोठडीत 18 नोव्हेंबरपर्यंत वाढ)

मिका सिंगला पाकिस्तानी चाहत्याने दिल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू-

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement