Gadar 2 Trailer: बहुप्रतिक्षित चित्रपट 'गदर 2' चा ट्रेलर प्रदर्शित; पाहायला मिळणार धमाकेदार अॅक्शन, 22 वर्षानंतरही तारा सिंगची क्रेझ कायम (Watch Video)

चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आणि त्याची झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. आता आज संध्याकाळी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

Gadar 2 Trailer

या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या 'गदर 2' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर आज प्रदर्शित झाला आहे. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर चित्रपट 'गदर 2' ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये याची जोरदार चर्चा आहे. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आणि त्याची झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. आता आज संध्याकाळी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

ट्रेलरमध्ये दिसून येत आहे की, तारा सिंगचा मुलगा जिते पाकिस्तानच्या भूमीवर कैद होतो आणि त्याला सोडवण्यासाठी तारा सिंग पाकिस्तानमध्ये पोहोचतो. तिथून तो आपल्या मुलाला कसा बाहेर काढतो हे या चित्रपटामध्ये दिसणार आहे. 'गदर 2' प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन देणार आहे हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित, हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे व त्याद्वारे 22 वर्षांनंतर तारा सिंह आणि सकिना यांची जोडी पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. (हेही वाचा: OMG 2: ‘ओह माय गॉड 2’मधील 20 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री)

पहा गदर 2 चा ट्रेलर-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement