Sridevi Death Anniversary: श्रीदेवीच्या पुण्यतिथीला मुलगी खुशी कपूर झाली भावूक; फोटो शेअर करत काढली आईची आठवण
Sridevi Death Anniversary: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची आज पुण्यतिथी आहे. 2018 मध्ये या दिवशी त्यांचे निधन झाले. आज त्यांची सहावी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने दिवंगत अभिनेत्रीची धाकटी मुलगी आणि अभिनेत्री खुशी कपूर हिने आईची आठवण काढली आहे. तिने श्रीदेवीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा खुशी आणि जान्हवी कपूर खूप लहान होत्या. यामध्ये दोन्ही मुलींचा बालपणीचा लूक पाहायला मिळतो. या फोटोमध्ये दोन्ही मुली आपल्या आईसोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)