क्रिकेटर Virat Kohli दुसऱ्यांदा झाला पिता; पत्नी Anushka Sharma ने दिला मुलाला जन्म, जाणून घ्या काय ठेवले बाळाचे नाव
क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा पिता झाला आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्माने एका मुलाला जन्म दिला आहे.
Virat Kohli-Anushka Sharma Blessed With Baby Boy: क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा पिता झाला आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्माने एका मुलाला जन्म दिला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून विराटने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी आपल्या बाळाचे नाव अकाय (Akaay) ठेवले आहे. अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारी रोजी बाळाला जन्म दिला. विराटने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे, 'अत्यंत आनंदाने आम्ही आनंदाची बातमी देत आहोत की, 15 फेब्रुवारी रोजी आमच्या घरी मुलाचा आणि वामिकाचा धाकटा भाऊ अकायचा जन्म झाला. यावेळी आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत.' अहवालानुसार विराट आणि अनुष्का सध्या लंडनमध्ये आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न झाले. हे लग्न इटलीतील टस्कनी येथे एका इंटिमेट सोहळ्यात पार पडले. लग्नाच्या तीन वर्षानंतर 11 जानेवारी 2021 रोजी या जोडप्याने एका मुलीचा जन्म दिला. (हेही वाचा: Hardik Pandya Training: हार्दिक पांड्याचा आयपीएलपूर्वी जोरदार सराव, दुखापतीनंतर पुनरागमन करण्यासाठी मेहनत, पाहा व्हिडिओ)