Bastar The Naxal Story Teaser: बस्तर: द नक्सल स्टोरीचा टीझर आऊट, ही अभिनेत्री मुख्य भुमिकेत
या चित्रपटांच टीझर लॉंच झाले आहे. या टीझरनी प्रेक्षकांचे मन वळवून घेतले आहे.
Bastar The Naxal Story Teaser: बस्तर द नक्सल स्टोरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांच टीझर लॉंच झाले आहे. या टीझरनी प्रेक्षकांचे मन वळवून घेतले आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भुमिकेत झळकणार आहे. बस्तर द नक्सल स्टोरी हा चित्रपट नक्षलवाद्यांच्या जीवनावर असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. टीझर लॉंच झाल्यापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे. टीझर वर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा चित्रपट येत्या १५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बस्तर द नक्सल स्टोरी मध्ये अदा शर्मा ही नीरजा माधवनच्या भूमिकेत दिसणार आहे.गेल्या वर्षापासून चित्रपटाचं शुटींग सुरु होतं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)