अभिनेत्री Deepika Padukone आणि अभिनेता Ranveer Singh यांनी दाखवली बाळाची पहिली झलक; नाव ठेवले ‘Dua’, पहा फोटो

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी लग्नाच्या 5 वर्षानंतर 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या मुलीचे नाव, ‘दुआ’ असे ठेवले आहे.

Dua Padukone Singh, Deepika Padukone and Ranveer Singh (Photo Credits: Instagram/ Instagram)

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली. यासोबतच त्यांनी बाळाच्या नावाचाही खुलासा केला. यासाठी दोघांचेही चाहते आतुरतेने वाट पाहत होते. दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी लग्नाच्या 5 वर्षानंतर 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या मुलीचे नाव ‘दुआ’ असे ठेवले आहे. 'दुआ' म्हणजे प्रार्थना. या फोटोमध्ये दीपिका पदुकोणने दुआला मांडीवर घेतले आहे, ज्यामध्ये तिचे फक्त पाय दिसत आहेत. दीपिका पदुकोणच्या मुलीचा जन्म एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये झाला, सुमारे 7 दिवसांनी दीपिका पदुकोणची मुलगी 2 महिन्यांची होणार आहे.

दरम्यान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा कॉप युनिव्हर्स चित्रपट 'सिंघम अगेन' आज 1 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रणवीर-दीपिकाशिवाय अजय देवगण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात सलमान खान आणि अक्षय कुमार यांचा कॅमिओ आहे. (हेही वाचा: Akshay Kumar's Help to monkeys in Ayodhya: अयोध्येमधील माकडांना मिळाला अक्षय कुमारचा आधार; जेवू-खाऊ घालण्यासाठी केली कोट्यावधी रुपयांची मदत)

दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी दाखवली बाळाची पहिली झलक-

 

View this post on Instagram

 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now