India Vs Pakistan ICC Cricket World Cup: क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आज भारत विरूद्ध पाकिस्तान; अनुष्का शर्मा अहमदाबाद मध्ये दाखल

अनुष्का दुसर्‍यांदा आई होणार असल्याने यंदा ती टीम इंडियाला चिअर करण्यासाठी स्टेडियम मध्ये प्रत्यक्ष उपस्थित नसेल अशीही चर्चा मागील काही दिवसांत रंगली होती.

Anushka Sharma | Twitter

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आज भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. अहमदाबाद मध्ये रंगणार्‍या या सामन्यासाठी अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील गुजरातला दाखल झाली आहे. आज सकाळी ती एअरपोर्ट दिसली. मध्यंतरी अनुष्काच्या प्रेगनंसी च्या चर्चा रंगत होत्या. याबद्दल दोघांनीही बोलणं टाळलं होतं. अनुष्का दुसर्‍यांदा आई होणार असल्याने यंदा ती टीम इंडियाला चिअर करण्यासाठी स्टेडियम मध्ये प्रत्यक्ष उपस्थित नसेल असेही म्हटलं होतं.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)