Watch Video: या क्रिकेटरची भरतनाट्यम स्टाईल ऑफ स्पिन गोलंदाजी पाहून तुम्हीही पाहून चक्रावून जाल!
टीम इंडियाचा माजी सिक्सर किंग युवराज सिंहने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला जो नेटकऱ्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. युवराजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक गोलंदाज भरतनाट्यमच्या डांस स्टाईलमध्ये ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसत आहे.
क्रिकेट जगभरात पसंत केले जाणारे अन्य खेळांपैकी एक आहे. क्रिकेट वेड्यांचा भारतात या खेळाला सर्वोपरी मानले जाते.जवळपास प्रत्येक खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर एक दिवशीआपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहत असतो. प्रत्येक क्रिकेटर आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीसाठी ओळखला जातो. दिलस्कूप, हेलिकॉप्टर शॉट अशा काही वेगळ्या फटाक्यांनी आज क्रिकेटपटूंना ओळखले जाते. गोलंदाजीत देखील असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांनी त्यांची ओळख त्यांच्या चेंडू टाकण्याच्या शैलीवरुन निर्माण केली. एखाद्या गोलंदाजाला त्याची शैली तयार करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागते. तर, एक वेगळी शैलीने गोलंदाजी करताना सातत्यही राखावे लागते. टीम इंडियाचा माजी सिक्सर किंग युवराज सिंहने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला जो नेटकऱ्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video: डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचणा-या आजोबांना पाहून आजीबाईंचा चढला पारा, पाहा पुढे काय झाले)
युवराजने गोलंदाजीची शैली देखील ठेवली आणि त्याला तमिळनाडू येथे जन्मलेल्या भारतीय शास्त्रीय नृत्याशी हे जोडले. युवराजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक गोलंदाज भरतनाट्यमच्या डांस स्टाईलमध्ये ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत युवीने आपला माजी सहकारी आणि मित्र हरभजन सिंहला टॅग केले. "भरतनाट्यम स्टाईल ऑफ स्पिन !! काय म्हणतो @harbhajan3?" असं कॅप्शन देत टीम इंडियाच्या माजी अष्टपैलूने हा जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये युवीने तोंडावर झिपर असलेली ईमोजी देखील पोस्ट केले. अर्थातच या गोलंदाजाच्या शैलीने युवीची देखील बोलती बंद केली असे म्हटले तर चुकीचे तारणार नाही. पहा हा चक्रावून टाकणारा व्हिडिओ:
दरम्यान, युवराजने शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आणि त्यातील काहींना क्लिप पहात हसू अनावर झाले. गोलंदाजाच्या रनअपच्या स्पिनमुळे त्याच्या चेंडूंमध्ये काही फरक पडला नाही, परंतु फलंदाजांना बरेच लक्ष केंद्रित करावे लागले. आपण नेहमीच पहात आलो आहोत की गोलंदाजी करण्यापूर्वी गोलंदाज थोड्या लांबीने रणप घेतो, जेणेकरून चेंडूला योग्य लेन्थ-लांबी व वेग मिळतो. प्रत्येक गोलंदाज आपल्याच शैलीत गोलंदाजी करतो, परंतु या खेळडूची गोलंदाजी पाहून तुम्ही देखील चक्रावून जाल.