World's Oldest Land Animal: जगातील सर्वात जुना जिवंत प्राणी 'जोनाथन कासव' साजरा करत आहे आपला 191 वा वाढदिवस; 1832 मध्ये झाला होता जन्म
जोनाथन सध्या तरी बऱ्या स्थितीत आहे. दर रविवारी त्याला खास पदार्थ खायला घातले जातात. त्याची भूक जोमदार आहे. तो मोतीबिंदूमुळे आंधळा झाले आहे व त्याने वासाची जाणीव गमावली आहे आणि त्यामुळे तो अन्न शोधू शकत नाही. परंतु त्याची श्रवणशक्ती उत्कृष्ट आहे.
जगातील प्रत्येक सजीवाचे वय ठरलेले असते. काहींना काही मिनिटांचे आयुष्य लाभते, तर काही जणांना शेकडो वर्षांचे. तर सध्या असाच एक जिवंत दीर्घायू प्राणी (Oldest Animal) चर्चेत आहे, जो आपला 191 वा वाढदिवस साजरा करत आहे. हा प्राणी जोनाथन नावाचे कासव (Jonathan Tortoise) असून, तो जगातील भूमीवरील जिवंत असलेला सर्वात जुना प्राणी आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही प्रमाणपत्र देऊन याची पुष्टी केली आहे. जोनाथन कासव ज्या प्रजातीचे आहे त्याचे वैज्ञानिक नाव Aldabrachelys Gigantea Hololissa आहे. यापूर्वी, सर्वात वृद्ध प्राणी होण्याचा विक्रम तुई मलिला कासवाच्या नावावर होता, जो सुमारे 188 वर्षे जगला होता.
जोनाथन टर्टलचा जन्म 1832 मध्ये झाला असे मानले जाते. त्याचे वय शास्त्रीय पद्धतीने ठरवण्यात आले आहे. जोनाथनला 1882 मध्ये सेशेल्सहून सेंट हेलेना या दक्षिण अटलांटिक बेटावर आणण्यात आले. त्याच्यासोबत इतर 3 कासवेही होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, जोनाथन त्यावेळी पूर्णतः प्रौढ होता. या प्रजातीच्या कासवासाठी पूर्णपणे प्रौढ असणे म्हणजे त्यावेळी त्याचे वय सुमारे 50 वर्षे असण्याची शक्यता आहे.
सेंट हेलेनाचे गव्हर्नर स्पेन्सर डेव्हिस यांनी 1930 मध्ये या कासवाचे नाव जोनाथन ठेवले. मागच्या वर्षी अटलांटिक महासागरात वसलेल्या सेंट हेलेना बेटाचे गव्हर्नर निगेल फिलिप्स यांनी जोनाथन कासवाची जन्मतारीख 4 डिसेंबर 1832 मानली जाईल असे सांगितले होते. जोनाथनचे मुख्य काळजीवाहक सेवानिवृत्त पशुवैद्य जो हॉलिन्स म्हणाले की, हे कसाव इथले स्टार आहे. इथल्या वास्तव्यात अनेक बदल झाले. इथे जागतिक युद्धे झाली, ब्रिटीश साम्राज्याचा उदय आणि पतन झाले, अनेक राजे, सरकारे आली व गेली मात्र हे कासव अजूनही येथेच आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे. (हेही वाचा: 8th Wonder of the World: इटलीच्या Pompeii ला मागे टाकत कंबोडियातील Angkor Wat Temple बनले जगातील 8 वे आश्चर्य; जाणून घ्या काय आहे खास)
जोनाथन सध्या तरी बऱ्या स्थितीत आहे. दर रविवारी त्याला खास पदार्थ खायला घातले जातात. त्याची भूक जोमदार आहे. तो मोतीबिंदूमुळे आंधळा झाले आहे व त्याने वासाची जाणीव गमावली आहे आणि त्यामुळे तो अन्न शोधू शकत नाही. परंतु त्याची श्रवणशक्ती उत्कृष्ट आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)