आश्चर्यम! बिकिनी म्हणून पातळ धागा परिधान करून समुद्रकिनारी फिरत होती तरुणी; पोलिसांनी केले अटक, ठोठावला दंड (See Photo)
हे पाहून इतर पर्यटकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यातील एकाने या मुलींचा फोटो काढून सोशल मिडियावर शेअर केला.
जगात अनेक गुन्हेगार असतात, कोणाला कोणत्या गुन्ह्यासाठी अटक होईल काही सांगता येत नाही. आता फिलीपिन्समध्ये (Philippines) चक्क बिकिनी (Bikini) घातल्याने एका तरुणीला अटक केली गेली आहे. बिकिनी घालण्यात तसे काही गैर नाही, मात्र या तरुणीने घातलेली बिकिनी ही फक्त नावालाच होती. अगदी धाग्याइतकी बिकिनी घालून ही मुलगी बीचवर फिरत असल्याने या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोशल मिडीयावर या मुलीचा फोटो व्हायरल झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. फिलीपिन्सच्या पुराणमतवादी समाजामध्ये ही गोष्ट स्वीकारणे शक्य नाही असे स्थानिक पोलिस आयुक्त जेस बेलॉन यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार फिलीपिन्समधील बोराके बेटावर एक मुलगी अगदी धाग्याइतकी बिकिनी घालून किनाऱ्यावर फिरत होती. हे पाहून इतर पर्यटकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यातील एकाने या मुलींचा फोटो काढून सोशल मिडियावर शेअर केला. पोलिसांनी हा फोटो पाहिल्यावर या मुलीला ताबडतोब अटक करण्यात आली. इतकेच नाही तर शिक्षा म्हणून तिच्यावर दंडही आकारण्यात आला आहे. (हेही वाचा: बिकिनी घालायला नकार दिल्याने या बड्या अभिनेत्रीने गमावली कोट्यावधी रुपयांची ऑफर)
लिन जू तिंग असे या मुलीचे नाव असून ती 26 वर्षांची आहे. लिन मुळची तैवान येथील असून, आपल्या प्रियकरासह फिरण्यासाठी या बीचवर आली होती. मात्र परिधान केलेल्या बिकिनीमुळे तिला अटक झाली. जोपर्यंत ती दंड म्हणून 3400 रुपये भरत नाही, तोपर्यंत तिला सोडले जाणार नाही असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र नेमक्या कोणत्या कायद्यानुसार ही कारवाई केली गेली याचा खुलासा पोलिसांनी केला नाही. या आधीही मुलगी अशी बिकिनी घालून 2 बीचवर फिरत होती.