Viral Video: विहिरीतून पाणी काढण्यासाठी एका इसमाने लढवली शक्कल, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल अचंबित
या व्हिडिओला त्यांनी एक सुंदर कॅप्शन देऊन ट्विट केले आहे
भारत देश म्हटला की येथील लोक आणि त्यांच्या आयडियाच्या कल्पना या सर्व जगाला अचंबित करतील अशा असतात. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याच्या विहिरी आहेत. या विहिरीतून (Well) पाणी काढण्यासाठी लोक रश्शीचा (काढणं) अथवा रहाटाचा वापर करतात. मात्र एका गावाकडच्या व्यक्तीने विहिरीतून पाणी काढण्यासाठी अजब शक्कल लढविली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. राजस्थानमधील हा व्हिडिओ आहे. त्या इसमाची विहिरीतून पाणी काढण्यासाठी शोधलेली युक्ती पाहून सर्वांचे डोळे अवाक होतील.
हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी प्रवीण कास्वां यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी एक सुंदर कॅप्शन देऊन ट्विट केले आहे.हेदेखील वाचा- झोपलेली मांजर सापाला रश्शी समजून मारत होती मीठी, नंतर काय झाल ते तुम्हीच पाहा (Watch Video)
'पाण्याची किंमत.. पाहा किती सहजतेने भौतिक विज्ञानाचा उपयोग केला आहे. या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करा.' असे कॅप्शन त्याने म्हटले आहे. 4 मे ला शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 30.2 K व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 341 जणांनी रीट्विट केला आहे आणि या व्हिडिओला 2,775 लाईक्स मिळाले आहेत.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ तुम्ही नीट बघाल तर कळेल एक व्यक्ती विहिरीजवळ उभा आहे. विहिरीपासून काही अंतरावर एक मोठी काठी त्याने दोन खांबांच्यामध्ये बांधली आहे आणि विहिरीजवळ असलेल्या लाकडाचे टोक रश्शीने बांधलेले आहे. ज्याला बादली बांधून ती तो विहिरीत टाकत आहे. त्यानंतर दोरी वर ओढून विहिरीतून पाणी काढत आहे. या भन्नाट देशी कल्पनेची लोकांकडून कौतुक केले जात आहे.