Dog Viral Video: कुत्र्याची वेणी लांबच लांब, हेअर स्टाईल पाहून नेटकरी म्हणतात 'किती छान'
कुत्रा असो की मांजर. अगदी पोपट, चिमणी आणि कबुतर सुद्धा. हे प्राणी, पक्षी एकदा का कुटुंबात आले की ते कुटुंबाचा सदस्यच होतात. अनेक कुटुंबे या प्राण्यांना आपल्या घरचे सदस्यच मानतात. त्यामुळे या प्राण्यांची विशेष दखलही घेतली जाते. कधी या प्राण्यांसोबत फॅशन केलेली पाहायला मिळते. जसे की, काही लोक त्यांना कपडे घालतात,
कुत्रा असो की मांजर. अगदी पोपट, चिमणी आणि कबुतर सुद्धा. हे प्राणी, पक्षी एकदा का कुटुंबात आले की ते कुटुंबाचा सदस्यच होतात. अनेक कुटुंबे या प्राण्यांना आपल्या घरचे सदस्यच मानतात. त्यामुळे या प्राण्यांची विशेष दखलही घेतली जाते. कधी या प्राण्यांसोबत फॅशन केलेली पाहायला मिळते. जसे की, काही लोक त्यांना कपडे घालतात, तर काही त्यांना फॅन्सी ट्रीट शिजवतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तर भलताच व्हायरल (Dog Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत दिसते की, एका कुत्र्याची त्याच्या मालकीणीने चक्क छानशी हेअरस्टाईल केली आहे. हा कुत्रा आहे की कुत्री हे कळू शकले नाही. पण त्याची हेअर स्टाईल मात्र जोरदार चर्चेचा (Dog Viral Video) विषय ठरली आहे.
Doggos Doing Things या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पृष्ठाचे 3.1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ते कुत्र्यांशी संबंधित असा आशय नियमित पोस्ट करतात. या पेजवर एक व्हिडिो शेअर करणयात आला आहे. व्हिडिओमध्ये हॅटी नावाचा कॉकर स्पॅनिअल कुत्रा आनंदाने पोज देत आहे आणि तिच्या दुहेरी डच वेण्यांना फ्लॉंट करत आहे. (हेही वाचा, Dog Viral Video: कुत्र्याचे पिल्लू आईच्या कुशीत, सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून अनेकांना वाटले कौतुक)
व्हिडिओ
View this post on Instagram
दरम्यान, ही माहिती लिहीण्यापूर्वी हा व्हिडिओ काही तासांपूर्वी शेअर करण्यात आला होता. आणि त्याला 1.1 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या अजूनही वाढत आहे. व्हिडिओ पाहून एका युजर्सने लिहीले आहे की, अरे, कुत्र्याचे केस माझ्यापेक्षा चांगले आहेत... रंग आणि स्टाईल दोन्ही. आणखी एकाने लिहीले आहे ही हेअरस्टाईल करणाऱ्या व्यक्तीला खरोखरच दाद दिली पाहिजे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2022 05:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

