IPL Auction 2025 Live

Viral Video: समुद्राच्या लाटांसोबत वाहून आला सोनेरी रथ, किनारपट्टीवर बघ्यांची गर्दी

हा रथ पाहायला मिळताच काही उत्साही नागरिकांनी समुद्राच्या पाण्यात प्रवेश करत तो किनारपट्टीवर ओढून आणला.

Golden Chariot | (Photo Credits: Twitter)

असानी चक्रीवादळ (Cyclone Asani) सुरु असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) राज्यात प्रशासनाने रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. या वादळाचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी समुद्रात आणि किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर वेगवान वारे वाहात आहे. समुद्रात उंचच उंच लाटाही पाहायला मिळत आहे. अशा वातावरणात सुमद्रात वादळी वाऱ्यासोबत लाटांवरुन एक सोनेरी रंगाचा रथ (Gold Coloured Chariot)किनारपट्टीवर वाहून आला आहे. हा रथ पाहायला मिळताच काही उत्साही नागरिकांनी समुद्राच्या पाण्यात प्रवेश करत तो किनारपट्टीवर ओढून आणला.

किनारपट्टीवर सोनेरी रंगाचा रथ वाहून आल्याची माहिती मळताच बघ्यांनी मोठीच गर्दी किनारपट्टीवर केली. विशेष म्हणजे प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला असून, किनारपट्टीपासून दूर राहण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील सुनापल्ली किनारपट्टी (Sunnapalli coast in Srikakulam) भागात हा रथ वाहून आला आहे. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी इथे सोनेरी रंगाचा सुंदर रथ वाहून आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. (हेही वाचा, Viral Video: बर्फाळ नदीत अडकलेल्या कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीने जिंकली यूजर्सची मने; पहा व्हायरल व्हिडिओ)

एएनआयने नौपाडा येथील एसआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कदाचित हा रथ एखाद्या दुसऱ्या देशातूनही आलेला असू शकतो. आम्ही या घटनेबाबत गुप्तचर विभाग आणि उच्च अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे.

ट्विट

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक रथ समुद्राच्या लाटांसोबत वाहून किनारपट्टीवर आला आहे. स्थानिग ग्रामीण नागरिकांनी हा रथ रश्शीने बांधून किनाऱ्यापर्यंत ओढत आणला आहे. रथाचा आकार दक्षिण पूर्व अशियातील देशांत असलेल्या मठासारखा आहे. असानी चक्रीवाधलामुळे भरकटून हा रथ इकडे आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आयएमडीचे निदेशक जनरल मृत्यूंजय महापात्रा यांनी म्हटले की, चक्रावत असानी हे पहिल्यापेक्षा कमी ताकदवान झाले आहे. त्यामुळे आता त्याचा प्रभाव हळूहळू कमी होत जाईल.