BJP Leader Viral Video: भाजप नेत्याला बायकोने चप्पलने चोपले; भलत्याच बाईशी रोमान्स आला अंगाशी, पाहा व्हायरल व्हिडिओ
Mohit Sonkar (photo credit- IANS)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) भाजप नेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) भलताच व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र व्हायरल व्हिडिओत या भाजप नेत्याची पत्नी त्याला चप्पलने चोपताना दिसत आहे. मोहीत सोनकर (BJP Leader Mohit Sonkar) असे या भाजप नेत्याचे नाव आहे. प्रकरण कानपूर येथील (Kanpur) आनंदपूरी कॉलनी परिसरातील आहे. मोहित सोनकर हे कथीतपणे भलत्याच बाईशी रोमान्स करत होते. या रोमान्सची माहिती त्यांच्या धर्मपत्नीला कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत सोनकर यांची चांगलीच धुलाई केली. हा थरारक घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल (Mohit Sonkar Viral Video) झाला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोहित सोनकर हे बंद खोलीत भाजपच्या महिला नेत्यासोबत उपस्थित होते. तेव्हा अचानकच त्यांच्या पत्नीचा प्रवेश त्या ठिकाणी झाला. या वेळी त्यांनी आफले पती भलत्याच कोणत्यातरी महिलेसोबत रोमान्स करतो आहे हे पाहून त्यांचा पारा चढला. त्यांनी रागाच्या भरात चक्क आपल्या पतीदेवाची चप्पलनेच धुलाई सुरु केली.

कथीत माहितीनुसार, मोहित सोनकर हे आनंदपुरी कॉलनी परिसरात कारमध्ये आपल्या प्रेयसीसोबत वाढदिवस साजरा करत होते. या वेळी त्यांची पत्नी आपल्या काही आप्तेष्ठांसोबत तिथे आल्या. त्यांनी आपल्या आप्तेष्टांसह पतीदेवांना चोप चोप चोपले. प्रकरणाची माहिती पोलिसांना कळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या मंडळींना पोलीस स्टेशनला नेले. तिथेही दोन्ही बाजूंनी जोरदार राडा केला. (हेही वाचा, Unnatural Sex साठी पत्नीवर जबरदस्ती; न्यायालयाने आरोपी पतीस नाकारला जामीन)

ट्विट

मोहित सोनकर हे बाबूपूरवा परिसरातील रहिवासी आणि कानपूर-बुदेलखंडचे क्षेत्रीय मंत्री आहेत. त्यांचा विवाह नौबस्ता प्रदेशातील तरुणीशी झाला आहे. शनिवारी त्यांच्या पत्नीला माहिती मिळाली की मोहित कोणा अन्य महिलेसोबत आनंदपुरी कॉलनीत बसले आहेत. तिथे त्यांचे भलतेच चाळे सुरु आहेत. पत्नीने घटनास्थळी जात प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा ते आपल्या प्रेयसीसोबत वाढदिवस साजरा करत होते. ते दृश्य पाहून त्यांचा पारा चढला आणि त्यांनी दोघांनाही कारच्या बाहेर ओढून चप्पलने चोपण्यास सुरुवात केली. या वेळी झालेल्या राड्यामुळे नागरिक जमा झाले. उपस्थित बघ्यांनी या घटनेचा व्हिडिओ चित्रित करत सोशल मीडियावर अपलोड केला जो आता चांगलाच व्हायरल झाला आहे.