Budget 2022 Viral Memes: निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताच ट्विटरवर मीम्स आणि जोक्सचा पाऊस, पाहा लोकांच्या प्रतिक्रिया

ट्विटरवर #Budget2022 हॅशटॅगसह मीम्सचा पूर आला आहे.

बजेट 2022 व्हायरल मीम्स आणि जोक्स (Photo Credits: ITwitter)

Budget 2022 Viral Memes: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारमधील मंत्र्यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. लोक या अर्थसंकल्पाची आतुरतेने वाट पाहत असतानाच, अनेकजण मजेदार जोक्स आणि मीम्सद्वारे ट्विटरवर त्यांची अपेक्षा आणि विचार शेअर करत आहेत.

दरवर्षीप्रमाणे या वेळीही सरकारने मध्यमवर्गीयांकडे लक्ष दिले नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. ट्विटरवर #Budget2022 हॅशटॅगसह मीम्सचा पूर आला आहे. लोकांना या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या. पगारदार वर्ग 80C मर्यादा वाढवण्याच्या आशेने अर्थमंत्र्यांकडे पाहत होता. चला तर मग अर्थसंकल्पानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही मीम्स आणि जोक्स बघूयात. (वाचा - Pradhan Mantri Berojgar Bhatta Yojana अंतर्गत युवकांना दरमहा 3500 रूपये मिळणार? पहा वायरल WhatsApp Message मागील सत्य)

सरकारी मध्यमवर्गीय करदात्यांकडून: 

पगार वर्गातील लोक:

गुंतवणूकदार:

स्टॉक मार्केट:

बजट 2022:

सरकारी आणि पगारदार कर्मचारी यांच्यात चर्चा - 

अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्ग:

मिडल क्लास:

मध्यमवर्गीय लोकांकडून फायदे शोधण्याचा प्रयत्न :

रिटेल इंवेस्टर्स:

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील निवडणुकांदरम्यान सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाला आहे. त्याचवेळी, कोरोनाच्या संकटाच्या काळात यावेळच्या अर्थसंकल्पात काय विशेष असेल याकडे देशातील प्रत्येक वर्गाचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन या त्यांच्या प्रदीर्घ भाषणासाठी ओळखल्या जातात. 2019 मध्ये त्यांनी 2.15 तास भाषण केले आणि 2020-2021 मध्ये 162 मिनिटे भाषण देऊन स्वतःचा विक्रम मोडला.