पराग आणि वैभव या दोन भारतीय तरुणांचा अमेरिकेत अनोखा विवाह; पहा फोटोज
विशेष म्हणजे या अनोख्या विवाहाचे फोटोजही सोशल माध्यमांवर शेअर करण्यात आले आहेत.
अमेरिकेत राहत असलेल्या दोन भारतीय युवकांनी एकमेकांशी विवाह केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या अनोख्या विवाहाचे फोटोजही सोशल माध्यमांवर शेअर करण्यात आले आहेत. कुटुंबाच्या संमतीने हा अनोखा विवाहसोहळा अगदी धुमधडाक्यात पार पडला. पराग मेहता आणि वैभव जैन अशी या दोन तरुणांची नावे आहेत.
मेहंदी, संगीत, नाच-गाणे या सर्व सोहळ्यांसह विवाह पार पडला. यावर परागने एक खास पोस्ट देखील लिहिली आहे. त्यात तो म्हणतो की, जैन धर्मियांमध्ये लग्नाचे प्लॅनिंग करणे सर्वात कठीण काम आहे. कारण आम्हांला ठाऊक आहे की, भारतीय लग्नातील रितीरिवाज अतिशय स्ट्रिक्ट आहेत. यातील अनेक पद्धती या खासकरुन मुलींसाठी असतात. मात्र वैभवच्या प्लॅनिंगमुळे सारं काही सुरळीत झालं. त्याचबरोबर समाजातील काही पद्धती बदलण्यासही यामुळे नक्कीच मदत होईल.
पहा फोटोज:
दोन तरुणांच्या या अनोख्या विवाहसोहळ्यात परागने मेहंदी लावण्याचा विषय काढल्यावर मुलगे मेहंदी लावत नाहीत फक्त मुली मेहंदी लावतात असा सुर नातेवाईंकाकडून ऐकण्यात आला. त्यामुळे दोघांनीही हातावर मेहंदी काढली. नाचत गात वरात आल्यावर सासुने ओवाळून दोघांचेही स्वागत केले. अशा विविध विधींसह हा अनोखा विवाहसोहळा अगदी मस्त पार पडला. विशेष म्हणजे या समलैंगिक विवाहसोहळ्याला दोन्ही कुटुंबियांनी देखील संमती दिली.
आपल्या देशात अजूनही समलैंगिक नात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. त्यातच हा विवाह अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.