Little Girl Dance: चिमुकलीने केली मोठ्यांच्या डान्स स्टेप्सची कॉपी; पहा क्यूट व्हिडिओ
लहान मुलगी प्रशिक्षकासमोर उभी राहते आणि प्रत्येक डान्स स्टेप मोठ्या आत्मविश्वासाने कॉपी करते. ती मोठ्या सहजतेने नृत्य करते. या चिमुरडीच्या या डान्स स्टेप्स पाहून सर्वांनाचं आश्चर्य वाटत आहे.
Little Girl Dance: मुले प्रौढांना पाहून शिकतात आणि अनेकदा त्यांच्या कृतींचे अनुकरण करताना आढळतात. असाच एक मनमोहक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगी मोठ्यांच्या डान्स स्टेप्सची कॉपी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक नृत्य प्रशिक्षका प्रौढांच्या गटाला नृत्य शिकवताना दिसत आहे. दरम्यान, लहान मुलगी प्रशिक्षकासमोर उभी राहते आणि प्रत्येक डान्स स्टेप मोठ्या आत्मविश्वासाने कॉपी करते. ती मोठ्या सहजतेने नृत्य करते. या चिमुरडीच्या या डान्स स्टेप्स पाहून सर्वांनाचं आश्चर्य वाटत आहे.
ट्विटरवर @TheFigen ने ही क्लिप Some are born with rhythm या कॅप्शनसह शेअर केली आहे. हा व्हिडिओ लोकांना आवडला असून लोक कमेंट सेक्शनमध्ये या सुंदर मुलीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काहींनी तिच्या प्रतिभेचे तर काहींनी तिच्या निरागस डान्स मूव्ह्सचे कौतुक केले आहे. (हेही वाचा - Mango Maggi Viral Video: महिलेने बनवली 'मँगो मॅगी'; व्हिडिओ पाहून संतापले नेटीझन्स, Watch)
Some are born with rhythm.
— Figen (@TheFigen) May 17, 2022
एका यूजरने लिहिले की, 'मुलांचे निरीक्षण खूप मजबूत असते. आपण त्यांच्यासमोर जे काही करतो ते आपली कॉपी करतात. दुसर्याने म्हटलंय "अरे देवा, ती खूप गोंडस आहे." तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे, "असं वाटतयं की, एखाद्या ग्रूपचा प्रमुख पुढे चालत आहे आणि ही क्यूट चिमुरडी त्याच्या पावलावर पाऊल टाकत आहे. मुलगी परिपूर्ण आहे."
(The above story first appeared on LatestLY on May 19, 2022 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

