Paragliding करताना बिघडली मुलीची प्रकृती, इंस्ट्रक्टरला म्हणाली; 'मला खाली पाहू देऊ नकोस', पहा मजेशीर व्हिडिओ
The girl's health deteriorated while paragliding (PC- Twitter)

Paragliding Viral Video: आयुष्यात काहीतरी साहसी करायचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण साहस करणं हा मुलांचा खेळ नाही. बरेच लोक समोरच्या व्यक्तीशी स्पर्धा करतात. परंतु, त्यांना असं साहस करणं शक्य होत नाही. अशा लोकांसोबत एकतर काहीतरी विचित्र प्रकार घडतो किंवा त्यांच हसू होतं. असाच प्रकार या मुलीच्या बाबतीत घडला आहे. पॅराग्लायडिंग करत असताना या मुलीची प्रकृती बिघडली आणि ती आकाशातचं ओरडू लागली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पॅराग्लायडिंग करत असताना ही मुलगी अचानक घाबरते आणि जोरजोरात ओरडू लागते. ती तिच्या गाईडला मला खाली उतरवायला सांगते, मला भीती वाटते, माझे डोळे उघडत नाहीत. गाईड तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की, मॅडम तुम्हाला काहीही होणार नाही. अजिबात काळजी करू नका. पण ती मुलगी तरीही जोर जोरात ओरडते.

ती गाईडला सांगते की, भैया मी खाली पाहू शकत नाही. मला खाली पाहू देऊ नकोस. मुलगी घाबरलेली पाहून गाईडही घाबरून जातो आणि तिला सांगतो की, मॅडम कॅमेरा चालू आहे. तुमचा व्हिडिओ बनवला जात आहे, जर तुम्ही असे केले तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल. गाईडने असं म्हटल्यानंतर मुलीच्या चेहऱ्यावर हलके हसू येते. (वाचा - Paragliding करत तरूणाने 8000 फीट उंचीवर गायलं Maa Tujhhe Salaam! पहा Viral Video)

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ एम व्ही राव यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देतानना त्यांनी लिहिलं आहे की, 'पॅराग्लायडिंग ही एक अद्भुत गोष्ट आहे.' हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. यूजर्स या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.