Haryana Road Rage Incident: डॉक्टरला धडक देऊन गाडीच्या बोनेटवर 50 मीटरपर्यंत ओढलं; पंचकुलामध्ये रोड रेजची घटना, Watch Video

पंचकुलातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरने सांगितले की, ते सेक्टर 14 ला जात होते. परतत असताना ट्रॅफिक लाईटजवळ पोहोचताच आरोपी कारस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या कारला धडक दिली. कारमधील आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला असता तो त्याच्याशी बाचाबाची करु लागला. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आरोपीने चाकूही काढला.

Haryana Road Rage Incident: डॉक्टरला धडक देऊन गाडीच्या बोनेटवर 50 मीटरपर्यंत ओढलं; पंचकुलामध्ये रोड रेजची घटना, Watch Video
Panchkula Road Rage Video (PC - Twitter)

Haryana Road Rage Incident: पंचकुलामध्ये रोडरोमिओंची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारमधील आरोपीने आधी डॉक्टरला धडक दिली. त्यानंतर त्याला बोनेटला लटकवून सुमारे 50 मीटरपर्यंत ओढले. ही घटना पंचकुलाच्या सेक्टर 8-9 मधील असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारस्वाराने प्रथम पीडित डॉक्टरांच्या कारला धडक दिली. यानंतर त्याने 42 वर्षीय डॉक्टरला कारच्या बोनेटवर ओढत नेले. मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 4 येथील मनसा देवी कॉम्प्लेक्स (MDC) येथे राहणारे डॉ. गगन गर्ग हे त्यांच्या मुलाला शिकवणीतून घेण्यासाठी जात होते.

पंचकुलातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरने सांगितले की, ते सेक्टर 14 ला जात होते. परतत असताना ट्रॅफिक लाईटजवळ पोहोचताच आरोपी कारस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या कारला धडक दिली. कारमधील आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला असता तो त्याच्याशी बाचाबाची करु लागला. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आरोपीने चाकूही काढला. (हेही वाचा - Viral Video: निंदनीय! संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये मद्यधुंद रेल्वे कर्मचाऱ्याने केली लघवी, सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ, Watch)

गगन गर्गने सांगितले की, मी आरोपीपासून स्वतःला वाचवले आणि गाडीत बसलो. आरोपींनी त्यांच्या गाडीचीही तोडफोड केली. पीडित डॉक्टरने सांगितले की, आरोपीच्या गोंधळानंतर काही लोक घटनास्थळी जमा झाले. यानंतर तो कारमधून बाहेर पडला. दरम्यान, आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत गाडीचा वेग वाढवला. मी आरोपीच्या गाडीवर अचानक पडलो, त्यानंतर त्याने मला बोनेटवर ओढले आणि काही अंतरापर्यंत नेले. यादरम्यान आरोपीची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका हातगाडीला धडकली, त्यामुळे डॉक्टर बोनेटवरून खाली पडले आणि आरोपीने तेथून पळ काढला.

या घटनेनंतर पीडित डॉ. गर्ग यांनी रूग्णालयात पोहोचून उपचार घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपी कार चालकाला अटक करण्यात येईल असं सांगितलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2023 12:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).