Boycott Tanishq: तनिष्क च्या नव्या जाहीरातीवर लव्ह जिहादचा आरोप, ट्विटरवर #BoycottTanishq म्हणत युजर्सने दिल्या 'या' प्रतिक्रिया

या जाहिरातीची कथा आंतरजातीय विवाहावर आधारित आहे.दोन धर्मांबद्दल बोलणाऱ्या या जाहिरातीमुळे बरीच खळबळ उडाली आहे.ही जाहिरात सोशल मीडियावर देखील चर्चेचा विषय बनली आहे.लोकांकडून याबद्दल विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Tanishq new ad (Photo Credits: Video screenshot)

सणसुदीच्या दिवसांसाठी अवघे एक महिन्यांहून कमी दिवस शिल्लक राहिले आहेत.अशा परिस्थितीत लोकप्रिय दागिन्यांचा ब्रँड तनिष्कने आपली नवीन जाहिरात लाँच केली आहे. या जाहिरातीची कथा आंतरजातीय विवाहावर आधारित आहे.दोन धर्मांबद्दल बोलणाऱ्या या जाहिरातीमुळे बरीच खळबळ उडाली आहे.ही जाहिरात सोशल मीडियावर देखील चर्चेचा विषय बनली आहे.लोकांकडून याबद्दल विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.(Shocking: 8 वर्षाच्या मुलीला आवडतं आपल्या 11 फुट पाळीव अजगरासोबत पोहायला, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण; Watch Video)

टाटा समूहाचा ज्वेलरी ब्रँड असलेला तनिष्क हा देशात खूप लोकप्रिय आहे.याचे केवळ दागिनेच नाही तर त्यांच्या जाहिरातींना देखील खूप प्रतिसाद लोकांकडून दिला जातो.अलीकडेच तनिष्कने आपली नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या जाहिरातीमध्ये हिंदू महिला दाखवण्यात आली आहे.जी मुस्लिम कुटुंबात लग्न करुन गेली आहे.त्या महिले्च्या बेबी शॉवरचा प्रोग्राम असल्याचे जाहिरातीत दाखवण्यात आले आहे.हिंदू संस्कृती लक्षात घेता मुस्लिम कुटुंबाकडून हा सोहळा हिंदू धर्माप्रमाणे सर्व विधीनुसार पाडला जात आहे.बहुतांश लोकांना हिंदू आणि मुस्लिम धर्माबद्दल बोलणारी ही जाहिरात आवडली नाही. ही जाहिरात हिंदू 'लव्ह जिहाद' ला प्रोत्साहन देण्यासारखी आहे असे म्हटले जात असल्याची आता लोकांकडून टीका केली जात आहे.(रातोरात व्हायरल झालेला निळ्या डोळ्यांचा Pakistani Chaiwala पुन्हा एकदा चर्चेत; इस्लामाबादमध्ये सुरु केला स्वतःचा कॅफे, पहा Arshad Khan च्या 'Cafe Chaiwala Rooftop’ ची झलक)

>>सोशल मीडियात युजर्सने तनिष्कच्या नव्या जाहीरातीवरुन दिल्या 'या' प्रतिक्रिया

Tweet:

Tweet:

सोशल मीडियावरही तनिष्कची ही नवी जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे.काही जणांनी त्याला लव्ह जिहादचे नाव दिले आहे.तर काही जणांनी हिंदूच्या विरोधात असल्याचे या जाहीरातीवर म्हटले आहे.अनेक लोक तनिष्कचे दागिने न खरेदी करण्यासह त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. तनिष्कचा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे.तसेच नागरिकांकडून जाहिरातीबद्दल विविध कमेंट करण्यासह प्रतिक्रिया सुद्धा दिल्या गेल्या आहेत.