Super Vaccine: मच्छरांच्या थुंकीपासून तयार होणार 'सुपर लस'; डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, जीका आदी आजारांचा होणार खात्मा - संशोधन

परंतु, आता एका संशोधनानुसार, मच्छरांपासून होणाऱ्या आजारांवर मच्छरांच्या लाळेचा वापर करून सुपर लस तयार करता येणार आहे. या लसीमुळे मानवी शरीरात विषाणूंपासून होणाऱ्या आजारापासून सुटका होणार आहे. 'राउटर्स' या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

Mosquito (Photo Credits: Wikimedia Commons)

Super Vaccine: मच्छर (Mosquito) चावल्याने आपल्याला विविध आजार उद्भवण्याची शक्यता असते. परंतु, आता एका संशोधनानुसार, मच्छरांपासून होणाऱ्या आजारांवर मच्छरांच्या लाळेचा वापर करून सुपर लस (Super Vaccine) तयार करता येणार आहे. या लसीमुळे मानवी शरीरात विषाणूंपासून होणाऱ्या आजारापासून सुटका होणार आहे. 'राउटर्स' या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार, मच्छरांच्या लाळेत असणाऱ्या एका प्रोटीनच्या मदतीने ही लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या लसीमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, जीका, मायरो, यलो फिव्हर आदी आजारांपासून सुटका होणार आहे. गुरुवारी प्रसिद्ध नियतकालिक 'लांसेट' मध्ये जेसिका आणि त्यांच्या सहकार्याचे संशोधन प्रकाशित करण्यात आलं होतं. (हेही वाचा - दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलच्या डॉक्टरकडून COVID-19 ची सौम्य लक्षणं असणार्‍यांसाठी वैद्यकीय औषधांचा सल्ला? जाणून घ्या व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत असलेल्या मेसेज मागील सत्य)

जेसिका यांच्या संशोधनानुसार, मच्छराच्या लाळेपासून तयार करण्यात आलेल्या लसीची पहिली क्लिनिकल ट्रायल झाली आहे. मच्छरांच्या लाळेपासून तयार झालेली लस Anopheles सुरक्षित आहे. या लसीमुळे मानवी शरीरात अॅण्टीबॉडीची निर्मिती होते, असंही या शोधनिंबधात म्हटलं आहे. परंतु, सध्या हे संशोधन प्राथमिक अवस्थेत असल्याचं संशोधक मायकल मॅकक्रॅकनन यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मायकल मॅकक्रॅकनन यांनी सांगितलं की, हे संशोधन अतिशय महत्त्वाचं आहे. मलेरियामुळे प्रत्येक वर्शी 4 लाख जणांना आपला जीव गमवावा लागतो. गरीब देशांना याचा मोठा फटका बसतो. या देशांमध्ये आरोग्य व्यवस्थादेखील भक्कम नसते. या देशात या आजारावर लस निर्मितीही होत नाही. (हेही वाचा - Cricket in Quarantine: क्वारंटाइन सेंन्टरमध्ये रंगला क्रिकेटचा सामना; जॉन्टी रोड्स यांनी शेअर केलेला व्हायरल व्हिडिओ पाहून कठीण काळात तुमच्यातही जोश भरेल (Watch Video))

सध्या देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेला आहे. परंतु, अद्याप या आजारावर कोणतीही लस मिळालेली नाही. कोरोनावरील लस शोधून काढण्यासाठी सर्वचं देशातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.