Breast Sweat:'स्तनांचा घाम' विकून करते बक्कळ कमाई, 'पाद विक्री' करणाऱ्या Stephanie Matto नामक तरुणीचा नवा व्यवसाय
पाद विक्री (Fart Sell) करुन बक्कळ पैसा आणि नाव कमावलेल्या स्टेफनी मॅटो (Stephanie Matto) या तरुणीस आपला व्यवसाय बंद करावा लागला. म्हणून ती काही स्वस्त बसली नाही. मुळातच कल्पक असलेल्या पाद विक्री बंद होताच 'स्तनांचा घाम' (Breast Sweat) विकण्यास सुरुवात केली.
पाद विक्री (Fart Sell) करुन बक्कळ पैसा आणि नाव कमावलेल्या स्टेफनी मॅटो (Stephanie Matto) या तरुणीस आपला व्यवसाय बंद करावा लागला. म्हणून ती काही स्वस्त बसली नाही. मुळातच कल्पक असलेल्या पाद विक्री बंद होताच 'स्तनांचा घाम' (Breast Sweat) विकण्यास सुरुवात केली. 'स्तनांचा घाम' विक्री व्यवसायातही (Matto start Breast Sweat Selling Business) स्टेफनी मॅटो हिने चांगलाच जम बसवला आहे. पादाच्या व्यवसायाप्रमाणेच आता तिच्या स्तनांच्या घामाचीही जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
स्टेफनी मॅटो (Stephanie Matto) ही तरुणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडिया प्रभावक (Social Media Influencer) आणि यूट्यूबर (YouTuber) अशीच ती स्वत:ची ओळख करुन देते. सुरुवातीला तिने पाद विक्री व्यवसाय सुरु केला होता. ती आपला स्वत:चा पाद विकायची. आपला पाद ती एका जारामध्ये भरुन ठेवायची आणि त्याची विक्री करायची. धक्कादायक म्हणजे अधिकाधिक पाद निर्मितीसाठी तिने आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदलेल्या होत्या. त्यासाठी ती दिवसातून तीन वेळा प्रोटीन शेक घेत असे. शिवाय अंडी आणि इतरही प्रोटीनयुक्त आहार मोठ्या प्रमाणावर खात असे. जेणेकरुन अधिकाधिक पाद निर्माण व्हावा. परंतू, आरोग्याची तक्रा उद्भवल्याने डॉक्टरांनी तिला हा व्यवसाय त्वरीत बंद करण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे तिला तो धंदा बंद करावा लागला. सहाजिकच ती नव्या व्यवसायाच्या शोधात होती. (हेही वाचा, काय सांगता? स्वतःची 'पाद' विकून टीव्ही स्टारने आठवड्याला कमावते 37 लाख रुपये; काचेच्या बाटलीत भरून ऑनलाईन विकते Fart (Watch Video))
स्टेफनी मॅटो (Stephanie Matto) हिने मग 'स्तनांचा घाम' विक्री व्यवसाय सुरु केला. अल्पावधितच तिला जोरदार प्रसिद्धीही मिळाली. लोकांकडून तिला चक्क ऑर्डरही मिळू लागल्या हे विशेष. एखाद्या हॉट केकप्रमाणे (Hot Cakes) ती आपल्या स्तनांचा घाम विकते. स्तनांच्या घामाने भरलेल्या विशिष्ट बरण्या विकून ती प्रतीदिन USD 5000 म्हणजेच भारतीय भाषेत Rs 4 Lakh रुपये कमावते. पाद विक्रीच्या हटके व्यवसायानंतर आता तिच्या या नव्या व्यवसायानेही चांगलीच गती पकडल्याचे दिसते आहे.
स्टेफनी मॅटो ही मुळची यूएसमधील कनेक्टिक (Connecticut, US) येथील आहे. तिने अल्पावधीतच स्तनांचा घाम विक्री व्यवसायात चांगला जम बसवला आहे. सध्या तीने घामाचे उत्पादन अधिकाधिक कसे वाढेल आणि बाजारातील मागणीप्रमाणे घाम कसा मिळू शकेल यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्य म्हटले आहे की, हे काम सोपे नाही. परंतू, कोणी मागणी केली तर अवघडही नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)