Snake Bite To Penis: युवकाचे लिंग सर्पदंश झाल्याने दुखावले, त्याच्या जखमेवर डॉक्टरांनी तीन टाके घातले, बँकॉक येथील घटना
डॉक्टरांनी या तरुणावर तत्काळ उपचार केले. त्याच्या जखमी लिंगावर तीन टाके घातले आणि सापाच्या विषावर गुणकारी औषधही दिले.
आपल्याकडे अनेकांना शौचासाठी टॉयलेटमध्ये जायची भीती वाटते. टॉयलेटमध्ये जायचे म्हटले की, टॉयलेटचे भांडे (कमोड) पडणार तर नाही ना?, त्यात साप, विंचू झुरळ आसे प्राणी तर असणार नाहीत ना? असलेच तर ते आपल्याला चावणार तर नाहीत ना? असे एकाहून एक भयंकर परंतू नाकारता न येण्यासारखे प्रश्न पडतात. पण, थायलंडची देशाची राजधानी (Capital Of Thailand) बँकॉक (Bangkok) येथे खोरोखरच एक असा धक्कादायक प्रकार घडला आहे. टॉयलेटमध्ये गेलेल्या एका युवकाच्या लिंगाला सापा चावला (Snake Bite Penis) आहे. या तरुणाच्या शिश्नाला (Penis) तीन टाके पडले आहेत. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, थायलंड देशाची राजधानी असलेल्या बँकॉक शहरापासून साधारण 13 मैल अंतरावरील एका ठिकाणी ही घटना घडली. सिराफोप मसुकारत नावाचा एक 18 वर्षीय यूवक शौचाविधीसाठी शौचालयात गेला होता. तो ज्या शौचालयात गेला होते तेथील कमोड उंचावर आणि विशिष्ठ पद्धतीचे होते. शौचविधी करत असताना अचानक त्याला लिंगातून वेदना जाणवू लागल्या. त्याने निरखून पाहिले असता त्याला धक्का बसला. (हेही वाचा, जाणून घ्या भारतात आढळणाऱ्या विषारी सापांच्या खास प्रजाती)
धक्कादायक म्हणजे युकाने पाहिले तेव्हा एका सापाने युवकाचे गुप्तांग तोंडाने पकडून ठेवले होते. घाबरलेल्या सिराफोप मसुकारत याने सापाच्या तावडीतून आपले लिंग कसेबसे सोडवले. तो शौचालयातून बाहेर आला. घडला प्रकार आईला सांगितला आणि आईसोबत तो बांग येई रुग्णालय येथे दाखल झाला. डॉक्टरांनी या तरुणावर तत्काळ उपचार केले. त्याच्या जखमी लिंगावर तीन टाके घातले आणि सापाच्या विषावर गुणकारी औषधही दिले. (हेही वाचा, धोका टळला: एक वर्षाचा मुलगा सापाला चावाला, शरीराचा तुकडाच गिळला खेळताना)
सिराफोप मसुकारत याने डेली मेल या संकेतस्थळाला प्रतिक्रिया देताना सांगितले की, तो शौचासाठी कमोडवर बसला असताना अचानक त्याचे लिंग दुखू लागले आणि खेचल्याचे जाणवू लागले. त्याने पाहिले तर एक साप त्याचे लिंग पकडून राहिला होता. साप लाहान होता. या सापाने लिंगाला चावा घेतला होता. तसेच, त्यामुळे झालेल्या जखमेतून रक्तही येत होते.
पुढे बोलताना सिराफोप मसुकारत याने सांगितले की, साप पकडणाऱ्या व्यक्तिला बोलावून साप पकडण्या आला. या वेळी हा साप सुमारे चार फूट लांबीचा असल्याचे आढळले. घडल्या प्रकारामुळे माझ्या आईला मोठा धक्का बसला. हा साप विषारी नव्हता परंतू, घडल्या प्रकारामुळे आम्ही घाबरुन गेलो. साप आमच्या घरात कसा शिरला हेही आम्हाला ठाऊक नसल्याचे त्याने सांगितले.