गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे सदाबहार गाणे ह्या चिमुरडीच्या तोंडून ऐकून गायक सोनू निगम ही गेला भारावून, Watch Video
हे चिमुरडीचे तिच्या बोबड्या शब्दातील गोडं गाणे ऐकताच तिच्या गळ्यात साक्षात माँ सरस्वती विराजते आहे असे वाटेल. गायक सोनू निगम नेही तिचे तोंडभरुन कौतुक केलय.
कलेला वय नाही असं म्हणतात, ते खरंच आहे. कारण एखाद्याच्या कपड्यालत्या पासून सर्व गोष्टीचं अनुकरण करता येते. मात्र एखाद्याच्या कलेचे अनुकरण करणे केवळ कठीण नव्हे तर अशक्य आहे. जगात असा कोणी व्यक्ती नाही ज्याच्या अंगी कोणती कला नाही. किंबहुना आपल्या अंगातील कलेवर आपण अख्ख जग जिंकू शकतो. असंच काहीसं केलय या चिमुरडीने. सध्या सोशल मिडिया लोकांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याचे एक उत्तम माध्यम बनत चाललं आहे. त्याची प्रचिती येईल ह्या गोड, निरागस चिमुरडीच्या गोड आवाजातील व्हिडिओ पाहून.
या चिमुडीने चक्क गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे 'लग जा गले' (Lag Ja Gale) हे अतिशय कठीण गाण्याचे बोल अगदी सहजपणे गायले आहे. हे चिमुरडीचे तिच्या बोबड्या शब्दातील गोडं गाणे ऐकताच तिच्या गळ्यात साक्षात माँ सरस्वती विराजते आहे असे वाटेल.
हे गाणे पाहून सुप्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) यांनी हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करुन तिची प्रशंसा करत त्याने या व्हि़डिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जरा या चिमुरडीला पाहा.... संगीत क्षेत्रात ती मोलाचं योगदान देणार आहे. ही खरंच दैवी देणगी आहे'. शिवाय कलाकार हा मुळात घडलेला असतो. इथे फक्त त्याला पैलू पाडण्याची गरज असते, असं म्हणत एका खऱ्या कलाकाराविषयी सोनूने भावना व्यक्त केल्या आहेत.
तिचा हा व्हिडिओ आतापर्यंत असंख्य व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहे.