Satara College Girls Fight: सातारा येथे नामांकित महाविद्यालयातील तरुणींची फ्री स्टाइल हाणामारी, पहा व्हिडिओ
यामध्ये काही तरुणी दिसून येत असून एक मुलगी दुसऱ्या मुलीला जबरदस्त मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Satara College Girls Fight: साताऱ्या (Satara) मधील एका नामांकित महाविद्यालयातील तरुणींच्या फ्री स्टाइल मारहाणीचा व्हिडिओ तुफान सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुणी दिसून येत असून एक मुलगी दुसऱ्या मुलीला जबरदस्त मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आजूबाजूला सर्वत्र पळापळ होत असली तरीही त्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सुद्धा तेथे उपस्थितीत असलेल्यांपैकी शूट केला आहे. हा प्रकार अत्यंत भयंकर असून याआधी सुद्धा अशा पद्धतीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.(Viral Photo: मधुचंद्राच्या रात्री पत्नीला पाहायचे सोडून पती पाहत होता 'ही' गोष्ट, नववधूची Reaction पाहून लोकांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया)
तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ हा व्हायरल होण्यापूर्वी त्यांच्या मधील काही जणींनी तो व्हॉट्सअॅप स्टेटसला तो ठेवला होता. व्हिडिओत अत्यंत गोंधळाची परिस्थिती दिसून येत असून शिवीगाळ ही केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी काहींना ताब्यात घेत त्यांना समज दिला आहे. महाविद्यालयातील हा एकूणच प्रकार पाहता तो अत्यंत भयंकर आणि संतापजनक आहे.(Zoom क्लास दरम्यान माइक बंद करण्यास विसरला विद्यार्थी, फोनमधून X-Rated आवाज येऊ लागल्याने वर्गाला झाले मनोरंजन)
पहा व्हिडिओ:
दरम्यान, सातारामध्ये महाविद्यालयातील तरुणींमध्ये झालेली ही हाणामारी नेमक्या कोणत्या कारणावरुन झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु अशा पद्धतीची मारहणा पाहता एखादा व्यक्ती गंभीर दुखापतीला सामोरा जाऊ शकतो किंवा त्यात जीव ही जाईल असे बोलण्यास काहीही हरकत नाही. त्याचसोबत महाविद्यालयाच्या तरुणींचा हा प्रकार पाहून आता सर्वत्र त्याची चर्चा केली जात आहे.