Sammi Sammi Song Viral Video: 'सामी-सामी' गाण्याच्या तालावर महिला नाचली, भलतीच व्हायरल झाली; पाहा व्हिडिओ
याच चित्रपटाली 'सामी-सामी' (Sammi Sammi Song) गाण्याची हुक स्टेप तर अनेकांना वेड लावून गेली. या गाण्याने अशीच एका महिलेलाही भूरळ घातली. आजीबाई वाटावी अशी ही मिला या गाण्यावर अशी काही थिरकली की पाहातच राहावे. आजीबाई वाटणाऱ्या या महिलेचा डान्स व्हिडिओ आता सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.
एखाद्या चित्रपटाचे गाणे इतके व्हायरल होते की, त्याचा प्रभाव बराच काळ इंटरनेटवर जाणवत राहतो. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) चित्रपटही असाच झकास. अनेकांनी नावाजलेला आणि प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला. या चित्रपटातील 'पुष्पा'चे गाणे आणि डायलॉग दोन्ही प्रेक्षकांना आवडले. याच चित्रपटाली 'सामी-सामी' (Sammi Sammi Song) गाण्याची हुक स्टेप तर अनेकांना वेड लावून गेली. या गाण्याने अशीच एका महिलेलाही भूरळ घातली. आजीबाई वाटावी अशी ही मिला या गाण्यावर अशी काही थिरकली की पाहातच राहावे. आजीबाई वाटणाऱ्या या महिलेचा डान्स व्हिडिओ आता सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.
'सामी-सामी' गाण्यावर डान्स करत असलेली ही महिला आणि व्हिडिओ कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सामी सामी गाण्याचे बोल कानावर पडताच ही महिला उत्तेजीत होते आणि थेट स्टेजवरच येते. इते ती या गाण्यावर ठेका धरुन डान्स करु लागते. तिचा डान्स पाहून सोशल मीडियावर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. काही लोकांनी तिच्यावर टीकाही केली आहे. परंतू, तिचे कौतुक करणाऱ्यांसी संख्या तुलनेत अधिक वाटते. (हेही वाचा, Viral Video: नवरीने हळदी समारंभात केला जबरदस्त डान्स; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ, Watch)
ट्विट
सोशल मीडियावर 'gieddee' नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. काहींनी लाईक केला आहे. व्हिडिओला अनेकांच्या प्रतिक्रियाही मजेदार पाहायला मिळत आहे. एका युजरने लिहीले आहे या महिलेने माझे हृदय जिंकले. दुसरीने लिहीले आहे , 'वाह..क्या डांस है.' व्हिडिओ जोरदारच व्हायरल झाला आहे.