PIB Fact Check: NEET PG 2022 परीक्षा लांबणीवर पडल्याचं सोशल मीडीयामधील वायरल वृत्त खोटं; पहा ट्वीट

यंदा नीट पीजी काऊंसलिंग 2021 ची प्रक्रिया उशिरा संपली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी कमी वेळ मिळाल्याचा दावा देखील काही विद्यार्थ्यांनी केला आहे.

Fake News | PC: Twitter/ PIB Fact Check

NEET PG 2022 परीक्षा लांबणीवर पडल्याची बातमी सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. मात्र हे खोटं वृत्त आहे. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) कडून ट्वीट करत याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. त्यांच्या माहितीनुसार यंदाची National Eligibility cum Entrance Test पुढे ढकलण्यात आलेली नाही.

यंदा नीट पीजी 2022 ची परीक्षा 21 मे 2022 दिवशी होणार आहे. अजून तरी या परीक्षेच्या तारखेमध्ये बदल झाल्याचं अधिकृतरित्या कुठेही जाहीर करण्यात आले नाही. दरम्यान पीआयबी फॅक्ट चेक कडूनही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याचं वृत्त फेटाळण्यात आलं आहे. तसेच विद्यार्थ्यांनी खोट्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये असेही सांगितलं आहे. हे देखील नक्की वाचा: PIB Fact Check: भारत सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी भारतीय युजर्सला देणार 3 महिने फ्री रिचार्ज? जाणून घ्या तथ्य.

पहा ट्वीट

सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर काही विद्यार्थी नीट पीजी 2022 पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. यंदा नीट पीजी काऊंसलिंग 2021 ची प्रक्रिया उशिरा संपली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी कमी वेळ मिळाल्याचा दावा देखील काही विद्यार्थ्यांनी केला आहे.

मागील दोन कोरोना संकटामुळे पीजी नीट 2022 परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. मात्र आता स्थिती सुधारल्याने पुन्हा ऑफलाईन स्वरूपात विशिष्ट नियमावली मध्ये राहून देण्यास सुरूवात झाली आहे.