आज गूगलने (Google) ओटो विक्टरले (Otto Wichterle) यांना आपलं डूडल (Doodle) समर्पित केलं आहे. त्यांच्या कामाला आणि जीवनाला अभिवादन म्हणून आजचं खास गूगल डूडल साकारण्यात आलं आहे. ओटो विक्टरले हे Czech Chemist होते. त्यांनी सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्स (Soft Contact Lens) बनवले आहेत. ओटो विक्टरले यांचा जन्म 1913 साली Czech Republic च्या Prostejov मध्ये झाला.
आजच्या गूगल डूडल वर ओटो विक्टरले हे हाताच्या बोटावर कॉन्टॅक्ट लेन्स धरून असल्याचं पहायला मिळत आहे. तर गूगलच्या लोगो मधून लाईट रिफ्लेक्ट होत असल्याचं पहायला मिळत आहे. हा लाईट दृष्टी म्हणून दाखवला गेला आहे. ओटो विक्टरले यांच्या संशोधनामुळे आज अनेकांना दृष्टीदान मिळालं आहे. नक्की वाचा: Kadambini Ganguly Google Doodle: डूडल साकारुन गूगल साजरी करतंय कादंबिनी गांगुली यांची 160 वी जयंती.
Today’s #GoogleDoodle honours the Czech scientist, Otto Wichterle, who invented the soft contact lens, revolutionising the optical industry. Read more about his brilliant work here: https://t.co/RUkh6HFvc1. pic.twitter.com/skUJBYMC3v
— Google India (@GoogleIndia) October 27, 2021
ओटो विक्टरले हे विज्ञानप्रेमी होते. त्यांनी पुढे organic chemistry मध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवली. 1936 मध्ये Prague Institute of Chemical Technology मध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. पुढे काही काळ त्यांनी प्रोफेसर म्हणून देखील काम केले.
ओटो विक्टरले हे Czech Republic ची निर्मिती झाल्यानंतर पहिले प्रेसिडंट म्हणून 1993 साली निवडून आले होते.