फेकून दिलेली चपाती भुकेलेल्या वृद्धाने धुवून खाल्ली; पहा स्टेशनवरील व्हायरल व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये या वृद्ध व्यक्तीने कुणीतरी फेकून दिलेली चपाती धुवून खाल्ली आहे. हा व्हिडिओपासून डोळ्यात पाणी येतं. भारतात दरवर्षी भूकबळीमुळे अनेकांचा मृत्यू होतो. भारतात रस्त्यावर किंवा स्टेशनवर अनेक गरीब लोक भीक मागत असतात. त्यांना एकवेळचं जेवण मिळणंही अशक्य असतं. त्यामुळे काही भिकारी तर अक्षरशा कचऱ्यातील अन्नही शोधून खातात. यापूर्वीही अशा स्वरुपाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

फेकून दिलेली चपाती भुकेलेल्या वृद्धाने धुवून खाल्ली (PC - Twitter)

सोशल मीडियावर एका वृद्धाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या वृद्ध व्यक्तीने कुणीतरी फेकून दिलेली चपाती धुवून खाल्ली आहे. हा व्हिडिओपासून डोळ्यात पाणी येतं. भारतात दरवर्षी भूकबळीमुळे अनेकांचा मृत्यू होतो. भारतात रस्त्यावर किंवा स्टेशनवर अनेक गरीब लोक भीक मागत असतात. त्यांना एकवेळचं जेवण मिळणंही अशक्य असतं. त्यामुळे काही भिकारी तर अक्षरशा कचऱ्यातील अन्नही शोधून खातात. यापूर्वीही अशा स्वरुपाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा या वृद्धाचा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, तो एका स्टेशनवरील असल्याचं दिसतंय. या वृद्धाने स्टेशनवरील नळावर चपाती धुतली आहे. त्यानंतर ती तशीचं खातं आहे. हा व्हिडिओ पाहून मन हेलावून जातं. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर सॅड इमोजी शेअर करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (हेही वाचा - Video: कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी एका तरूणाने लढवली अनोखी शक्कल; व्हिडिओ पाहून बसेल धक्का!)

हा व्हिडिओ ट्विट करणाऱ्या युजरने या व्हिडिओला ‘ये भूख ही तो है, जो किसी से पेट भरने पर रोटी फिकवा देती है और किसी से उसी रोटी को दुबारा उठवा के धुलवा लेती है,’ अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडिओ पाहून आपणही काहीतरी बोध घ्यायला हवा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif