Miss Universe 2019: सध्या सोशल मीडियावर जॉर्जियातील अटलांटा येथे पार पडलेल्या 68 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पर्धेक स्विमसूट राऊंडमध्ये एकामागून एक रॅपवॉक करत येत आहेत. यावेळी एक महिला स्पर्धेक पाय घसरून पडलेली पाहायला मिळत आहे. यावर्षी ‘मिस युनिव्हर्स’ किताबावर दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) हिने आपले नाव कोरले आहे. तिच्यावर संपूर्ण जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत भारताच्यावतीने सहभागी झालेल्या वर्तिका सिंहला मात्र अपयश आलं आहे.
दरम्यान, रँप वॉक करताना तोल जाऊन पडलेल्या मिस फ्रान्स माएवा कूचने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये माएवा स्विमसूट राऊंडमध्ये स्पर्धक रँपवॉक संपवून जात असताना घसरून पडलेली दिसत आहे. परंतु, पडलेल्या माएवाने आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. ती मोठ्या आत्मविश्वासाने उभं राहिली आणि आपला रँपवॉक पूर्ण केला. माएवानंतर याच जागेवर इतर काही स्पर्धेकही घसरून पडेल. मात्र, स्पर्धेक घसरून पडावेत यासाठी जाणीवपूर्व रँम्पची रचना करण्यात आली होती. (हेही वाचा - Miss Universe 2019: दक्षिण आफ्रिकेची सौंदर्यवती Zozibini Tunzi ने पटकावला ‘मिस युनिव्हर्स 2019’ चा किताब)
धडपडलं तरीही पुन्हा जोमाने उठून उभं राहणं, हे महिलांच्या जीवनाचं सार आहे, असं माएवाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटलं आहे. यावरून माएवाचा आत्मविश्वास आणि जिद्द याची प्रचिती येते. मागील वर्षी भारताची कन्या मानुषी छिल्लर हिला मिस युनिव्हर्स किताब मिळाला होता.