केरळ: प्री-वेडिंग फोटोशूट मधून कपलचा CAA-NRC ला विरोध, पहा फोटो
हे कपल तिरुवनंतरपुरम (Thiruvananthapuram) येथील राहणारे असून त्यांनी नुकतेच त्यांचे हे प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनसीआरच्या विरोधात जोरदार आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाला हिंसेचे वळण लागले असून यामध्ये अनेकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. मात्र एका कपलने त्यांच्या प्री-वेडिंग फोटोशूट मधून नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोध केला आहे. हे कपल तिरुवनंतरपुरम (Thiruvananthapuram) येथील राहणारे असून त्यांनी नुकतेच त्यांचे हे प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. कपल जीएल अरुण गोपी आणि आशा शेखर असे त्यांचे नाव असून First Look Photography यांनी त्यांचे हे फोटोशूट केले आहे.
आशा आणि अरुण या दोघांचे लग्न 31 जानेवारी 2020 मध्ये होणार आहे. तत्पूर्वी या दोघांनी फोटोशूट करत सीएए आणि एनआरसीचा विरोध केला आहे. तसेच फेसबुकवर फोटो शेअर करत त्याला आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे देशाने सुद्धा एकत्र रहावे असे कॅप्शन लिहिले आहे. देशातील विविध राज्यात या कायद्याला विरोध केला जात आहे. मात्र या दोघांनी एकमेकांच्या हातात सीएए आणि एनआरसीचे प्लेकार्ड हातात पकडले आहेत.(दिल्ली: जामिया मिला इस्लामिया युनिव्हसिटीच्या बाहेर मुस्लिम विद्यार्थ्यांनी अदा केली नमाज, अन्य धर्मियांनी दिले मानवी साखळीच्या माध्यमातून संरक्षण Video)
नागरिकता सुधारणा कायदा हा नुकताच देशात लागू केला आहे. त्यानुसार धार्मिक उत्पीडनाच्या कारणामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश येथून पळू भारतात आलेल्या हिंदू, ख्रिस्चन, शीख, पारसी, जैन आणि बौद्ध धर्माच्या लोकांना सीएए भारतीचे नागरिकत्व देते. तर एनआरसी म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप एक असे रजिस्टर आहे ज्यामध्ये तमाम वैध नागरिकांच्या नावाची नोंद करण्यात येते.