पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने सुपर ग्लू ने बंद केला पत्नीचा Vagina;पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली
अशाच एका जोडप्यामध्ये पत्नीकडून विवाहबाह्य संबंध ठेवल्याचं आरोप करत पतीने चक्क सुपर ग्लू च्या मदतीने व्हर्जायना (vagina)बंद केला आहे.
कोणतंही नातं हे विश्वासावर अवलंबून असते पण जेव्हा या विश्वासाला तडा जातो तेव्हा परिणाम गंभीर होतात. अशाच एका जोडप्यामध्ये पत्नीकडून विवाहबाह्य संबंध ठेवल्याचं आरोप करत पतीने चक्क सुपर ग्लू (Super Glue) च्या मदतीने व्हर्जायना (vagina) बंद केला आहे. पतीला अंधारात ठेवून पत्नी इतर 4 पुरूषांसोबत शारिरीक संबंध ठेवत असल्याच्या संशयावरून हा प्रकार करण्यात आला आहे. पार्टनरचे बाहेर अफेअर असल्याचा संशय आहे? जाणून घ्या का ठेवले जातात विवाहबाह्य संबंध.
दरम्यान पत्नीचा बदला घेण्यासाठी अशाच प्रकारे घृणास्पद कृत्य करणार्या पतीचं नाव Dennis Mumo असं आहे. 36 वर्षीय डॅनिस हा दक्षिण केनियाच्या कितुई भागातील आहे. त्याने केलेल्या दाव्यानुसार, सोशल मीडियातील काही मेसेजेस द्वारा त्याला पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची भणक लागली. डॅनिस कामानिमित्त घरा बाहेर पडला की त्याची पत्नी संधी साधून इतर पुरूषांसोबत संबंध ठेवत असे. त्यामुळे मागील Rwanda येथे कामानिमित्त निघण्यापूर्वी त्याने चक्क पत्नीचा व्हार्जायना सुपर ग्लूच्या मदतीने चिकटवून बंद केला.
डॅनिस ममो यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने केलेल्या या प्रकारामुळे त्याचं लग्न वाचू शकतं. दरम्यान पतीच्या या किळसवण्या प्रकारामुळे त्याच्या पत्नीला भयंकर वेदना सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान तिला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज आहे. या गुन्ह्याची पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर डॅनिसच्या शेजार्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान पत्नीचे चार इतर पुरूषांसोबत संबंध असल्याचे पुरावे त्याचे असल्याचे सांगितले आहे.
सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असून डॅनिस कडून जोडप्यामधील विसंवाद कमी करण्यासाठी प्रत्न केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.