Kaju Katli in Chicken Soup: दिवाळी निमित्त काजू कतली चिकन सूप चे मजेशीर Memes आणि Jokes व्हायरल; हैराण करणारे फोटो पाहून तुमचा विश्वास उडेल

काजू कतली चिकन सूप (Photo Credits: Twitter)

Kaju Katli in Chicken Soup: सर्वांच्या आवडीची काजू कतली ऐन दिवाळीच्या सणात Memes आणि Jokes च्या कचाट्यात अडकली गेली आहे. कारण सोशल मीडियात सध्या एक फोटो व्हायरल होत असून त्याला काजू कतली चिकन सूप असे म्हटले जाते आहे. त्यामुळे हे ऐकण्यास जरा विचित्र आहेच पण त्याचा फोटो तुम्ही पाहिल्यास तुम्हाला सुद्धा त्यावर विश्वास बसणार नाही. अशा पद्धतीचे फूड कॉम्बिनेशन हैराण करणारे आहे. या संबंधित मिम्स आणि जोक्सचा सोशल मीडियात पाऊस पडत आहे. याबद्दल युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात असून दिवाळीच्या सणादरम्यान अशा पद्धतीचे फूड पाहिल्याने सण आणि काजू कतली खाण्याचा मूडच बदलल्याचे काहींनी म्हटले आहे.(Paneer Tikka Funny Memes:अमेरिकेच्या कॉंग्रेसवुमन Pramila Jayapal यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत Kamala Harris यांना मतदान करण्यासाठी आवाहन करताना 'पनीर टिक्का' म्हणून बनवलेल्या डिशवरून नेटकर्‍यांनी घेतली त्यांची शाळा; पहा मजेशीर मिम्स)

व्हायरल झालेल्या फोटोत देशी मिठाई काजू कतली एका सूपमध्ये असल्याचे दिसून येत आहे. तर हे सूप तंतोतंत चिकन सूप सारखे दिसून येत आहे. यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचे Bizzare फूड कॉम्बिनेशन पहायला मिळाले आहे.(Kolhapur Pani Puri: शौचालयाच्या टाकीतील पाणी वपरुन चटकदार पाणीपुरी, कोल्हापूर येथील धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरल)

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

अशा विचित्र पद्धतीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे काजू कतली चिकन सूप तुफान सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चिकन सूप सोबत काजू कतली पाहून लोक हैराण झाले असून त्यांचे ती खाण्याचे मन सुद्धा उडाले आहे. चसेच ज्यावेळी मॅगी नूडल्स आणि पाणी पूरीचे कॉम्बिनेशन करण्यात आले होते तेव्हासुद्धा नागरिकांनी अशाच पद्धतीच्या रिअॅक्शन दिल्या होत्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif