Fact Check: सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळत आहे स्कॉलरशिप? सत्य घ्या जाणून
याशिवाय, बातम्यांचाही प्रसार वाढला आहे.
कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडिया (Social Media) वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय, बातम्यांचाही प्रसार वाढला आहे. सध्या सोशल मीडियावर एक बातमी प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात मेधावी योजनेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Scholarships) देण्यात येत आहे, असा दावा करण्यात आला आहे. भारत सरकारच्या मेधावी योजनेंतर्गत शिष्यवृती मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इयत्ता दहावी उतीर्ण पासून पीजी आणि डिप्लोमा विद्यार्थीदेखील यासाठी अर्ज करु शकतात. काही प्रश्नांची उत्तरे देऊन आपण ही शिष्यवृत्ती मिळवू शकतात, असे या बातमीत सांगितले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातमीची पीआयबी फेक्ट चेकने सत्यता तपासली. तसेच ही बातमी खोटी असल्याची त्यांनी सांगितले आहे. भारत सरकार मेधावी नावाची वेबसाइट किंवा अशी कोणतीही योजना भारत सरकार चालवित नाही, असे पीआयबीने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशाप्रकारच्या कोणत्याही बातम्यांच्या आहारी पडू नका, असे आवाहन पीआयबीने केले आहे. हे देखील वाचा- Father Stan Swamy यांना अखेरच्या काळात हॉस्पिटल बेड वर चेन ने बांधण्यात आल्याच्या दाव्यासह फोटो वायरल; जाणून या सोशल मीडीयात शेअर होत असलेल्या फोटोमागील सत्य
पीआयबीचे ट्वीट-
सध्या सोशल मीडियांवर खोट्या बातम्यांचा प्रसार अधिक वेगाने वाढला आहे. यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासून पाहणे गरजेचे आहे. तसेच फेक बातम्या शेअर करणे टाळावे.