IOCL त्यांच्या 40 व्या वर्षपूर्ती निमित्त Lucky Draw म्हणून मोबाईल फोन, टीव्ही फ्री गिफ्ट देत असल्याचे वायरल मेसेज खोटे; PIB Fact Check ने केला खुलासा
पण पीबीआय फॅक्ट चेकने या वायरल पोस्टची सत्यता पडताळली आहे.
सध्या सोशल मीडीयामध्ये इंडीयन ऑईल कॉरपरेशन लिमिटेड (IOCL) कडून त्यांच्या 40 व्या वर्षपूर्ती निमित्त खास ऑफर्स, ड्रॉ यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देणार्या पोस्ट वायरल होत आहेत. पण या खोट्या पोस्ट आहेत. दरम्यान सध्या फेसबूक, ट्वीटर, व्हॉट्सअॅप वर वायरल होणार्या या पोस्ट मध्ये नागरिकांना आकर्षक भेटवस्तू जिंकण्याचं आमिष दाखवत लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा असं आवाहन केले जात आहे. याद्वारा मोबाईल, टीव्ही अशी बक्षीसं जिंकण्याची संधी आहे असा दावा केला जात आहे.
दरम्यान इंडीयन ऑईल कॉरपरेशन लिमिटेड च्या 40 व्या वर्षपूर्ती निमित्तच्या या खास ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी एक प्रश्नावली भरा आणि आकर्षक बक्षीसं मिळवा असं देखील सांगण्यात आले आहे. पण पीबीआय फॅक्ट चेकने या वायरल पोस्टची सत्यता पडताळली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सारे तथ्यहीन आहे. पीआयबी ने नागरिकांना या फेक पोस्ट पासून सावध राहण्याचा सल्ला देताना IOCL ने असा कोणताच उपक्रम हाती घेतला नसल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे लकी ड्रॉ च्या मोहात पडून कोणतीही माहिती भरू नका असं आवाहन करण्यात आले आहे. (नक्की वाचा: Fact Check: PIN चोरी टाळण्यासाठी ATM मध्ये Transaction करण्यापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबा? जाणून घ्या RBI च्या नावे व्हायरल होणाऱ्या पोस्टमागील सत्य).
PIB Fact Check Tweet
सोशल मीडीयावर वायरल होणारे मेसेजेस सध्या नागरिकांसोबत सरकारला देखील डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे सरकार कडून त्यांच्या काही यंत्रणा या फेक न्यूजला रोखण्यासाठी, नागरिकांनाअशा खोट्या बातम्यांपासून दूर ठेवण्यासाठी काम करत आहेत. सध्या कोणत्याही मोठ्या घोषणांबाबत लोकांनी त्यांना माहिती मिळाल्यास त्यासंबंधित अधिकृत वेबसाईट एकदा तपासून पाहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरच लोकांनी विश्वास ठेवाव. माहिती पडताळून पहावी असं आवाहन देखील करण्यात आले आहे.