बायको अंघोळ करत नाही, घुसमटलेल्या नवऱ्याचा घटस्फोटासाठी अर्ज, महिला आयोगाने घेतली दखल
तसेच, या दोघांना आयोगाने पुन्हा एप्रिल महिन्यात भेटायला बोलावले आहे. दरम्यान, पत्नीवर उपचार करण्याचेही आदेश आयोगाने पतीला दिले आहेत.
खरं म्हणजे कोणा दाम्पत्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे योग्य नाही. आमचा तो हेतूही नाही. पण, प्रकरण जेव्हा महिला आयोगाकडे (Women's Commission) पोहोचते तेव्हा याची नोंद घेणे गरजेचे ठरते. प्रकरण आहे बिहार (Bihar) राज्यातील पटना (Patna) येथील मसौढी परिसरातील. येथील एका पतीने न्यायालयात धाव घेत बायकोपासून घटस्फोटाची (Divorce) मागणी केली आहे. घटस्फोटाचे कारणही भलतेच विचित्र आहे. पती महोदयांनी म्हटले आहे की, त्यांची पत्नी अंघोळ करत नाही आणि डोक्यावरचे केसही धूत नाही. तिच्या अशा वागण्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरते. अशा स्थितीत मला तिच्यासोबत राहणे शक्य नाही. दरम्यान, महिला आयोगाने प्रकरणाची नोंद घेत सध्यातरी या पतीपत्नींमध्ये समेट घडवून आणला आहे. या दोघांचा संसार तुटता तुटता राहिला आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार महिला आयोगासमोर महिल्यांदाच अशा प्रकारचे प्रकरण आले आहे. ज्या प्रकरणात केवळ स्वच्छतेमुळे कौटुंबीक कलह निर्माण होऊन तो कलह घटस्फोटापर्यंत पोहोचला. पत्नीच्या अशा विचित्र वागण्याला कंटाळून पतीने एक वर्षातच तिला मारहाण करुन घरातून पळवून लावले होते. एकदा अंघोळ केली की पुढचे अनेक दिवस अंघोळच करत नव्हती. पतीने तिला अनेकदा समजाविण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. तिची सवय कायम राहिली. कोणतीही सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नसल्याने पतीने घटस्फोट घेण्याचे ठरवले.
दरम्यान, पत्नीने महिला आयोगाकडे दाद मागत कौटुंबीक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर महिला आयोगाने पतीला नोटीस पाठवली. नोटीस मिळाल्यानंतर पती महिला आयोग कार्यालयात पोहोचला. त्याने सांगितले की, पत्नीच्या अंगाची दुर्गंधी येते. ती अनेक दिवस अंघोळ करत नाही. तिचे केसही धुत नाही. त्यामुळे केसांमध्येही जटा आणि कोंडा होतो. मी केस देण्यासाठी तिला शांपू दोतो तर त्याने ती अंथरून पांघरुन धुते.
महिला आयोग कार्यालयात पोहोचलेल्या या दाम्पत्याच्या लग्नाला एक वर्ष झाले आहे. लग्न झाल्यापासून पती पत्नीच्या अस्वच्छतेमुळे बेचैन आहे. या मुद्द्यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडण झाले आहे. पतीने अनेकदा तिला मारहाणही केली आहे. पतीने आरोप केला आहे की, पत्नीच्या माहेरकडील लोकांनी खोटे बोलून त्याच्यासोबत तिचा विवाह लाऊन दिला. ती तिच्या माहेरीही तशीच राहात असल्याचा आरोप पतीने केले आहे. (हेही वाचा, पँटमधल्या जिंवत सापामुळे तरुणाची रवानगी तुरुंगात, सुरु होण्याआधीच संपला विमानप्रवास)
दरम्यान, महिला आयोगाने या जोडप्याची समजूत काढून घटस्फोटाच्या निर्णयापासून त्यांना थांबवले आहे. तसेच, या दोघांना आयोगाने पुन्हा एप्रिल महिन्यात भेटायला बोलावले आहे. दरम्यान, पत्नीवर उपचार करण्याचेही आदेश आयोगाने पतीला दिले आहेत.