कोराेना विषाणूशी लढणाऱ्या मदतगारांना धन्यवाद देण्यासाठी Google ने साकारलं Packaging, Shipping, and Delivery Workers साठी खास Doodle

Google Doodle | Photo Credits: Google.com Homepage

कोरोना व्हायरस सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. दिवसागणिक वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या अनेकांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे. मात्र या कठीण काळातही नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही यंत्रणा काम करत आहेत. अशांपैकी एक म्हणजे पॅकेजिंग, शिंपिंग आणि डिलिव्हरी वर्कर्स! आज जगातील अग्रगण्य सर्च इंजिन असणार्‍या गूगलने त्यांच्यासाठी गूगल डूडल समर्पित केलं आहे. Coronavirus Pandemic च्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून गुगलने अत्यावश्यक सेवांमधील कामगारांना मानवंदना देण्यासाठी खास गूगल डूडलची सीरीज सुरू केली आहे. त्यापैकी आजची ही Packaging, Shipping, and Delivery Workers साठी असलेलं खास असलेले गुगल डुडल देखील तितकेच स्पेशल आहे. कोरोना विषाणू: Covid 19 संकटात किराणा सामान पुरवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे Thank You Coronavirus Helpers म्हणत गुगलने साकारले खास डूडल!

जगभरात नागरिकांना घरबसल्या अन्नधान्य, भाजीपाला, औषधं पोहचवण्यासाठी विविध कंपन्या पुढे आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट लेस डिलिव्हरीचा पर्याय दिला जात आहे. यामुळे जगभरात लोकांना अगदी घरपोच काही साहित्यांची सेवा मिळत आहे. भारतामध्येही फ्लिपकार्ट, अमेझॉनच्या बरोबरीने आता स्विगी सारखं फूड डिलेव्हरी अ‍ॅप देखील किराणा माल आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे.  कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी 'घरी रहा सुरक्षित रहा' आवाहन करणारं खास गूगल डूडल

गूगलने कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आणि या आजाराबाबत समाजात जनजागृती पसरवण्यासाठी गूगल डुडलच्या माध्यमातून एक विशेष सीरीज सुरू केली आहे. यामध्ये सुरूवातीला हात स्वच्छ धुण्याचं टेक्निक सांगणारं, त्यानंतर डॉक्टर्स, नर्सचे आभार मानणारे, किराणामाल सामान पुरवणारे यांचे आभार मानणारी गूगल डुडल्स साकारली होती.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांचा आकडा 20 लाखांच्या जवळ पोहचला आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा सव्वा लाखाच्या वर गेला आहे. या आजारातून 4,78,741 लोकं बरी देखील झाली आहेत. मात्र अमेरिका, इटली,स्पेन या देशामध्ये कोरोनाचं भयंकर रूप पहायला मिळालं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif