लग्नासाठी लहंगा घेण्यास गेलेल्या तरुणीला प्रसिद्ध डिझाइनरच्या टीमने केले Body Shaming, मागावी लागली माफी

कारण याच आठवड्याच्या सुरुवातीला एक इंस्टाग्रामवरील इंफ्लुएंसर डॉ. तान्या नरेंद्र हिने तिच्यासोबत या डिझाइनरच्या टीमने तिला बॉडी शेमिंग केले असल्याने त्या संदर्भातील तिने पोस्ट शेअर केली आहे.

Tarun Tahiliani and Dr. Tanaya (Photo Credits- Instagram)

प्रसिद्ध फॅशन डिझाइनर तरुण तहिलियानी (Tarun Tahiliani) सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण याच आठवड्याच्या सुरुवातीला एक इंस्टाग्रामवरील इंफ्लुएंसर डॉ. तान्या नरेंद्र हिने तिच्यासोबत या डिझाइनरच्या टीमने तिला बॉडी शेमिंग केले असल्याने त्या संदर्भातील तिने पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत या पोस्टमध्ये तिने बॉडी शेमिंग करण्यात आल्याने प्रसिद्ध डिझाइनरला खडे बोल ही सुनावले आहेत. तिने पोस्ट टाकल्यानंतर तरुण तहिलियानी याला माफी मागावी लागली आहे.(Farrukhabad: वराचा रंग काळा असल्याने लग्नमंडपात वधूने लग्न करण्यास दिला नकार, वाचा नेमकं प्रकरण काय ?)

डॉ. तान्या नरेंद्र हिने आपल्या लग्नाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोखाली एक मोठे कॅप्शन ही लिहिले आहे. त्यात तिने अंबावट्टाचे प्रसिद्ध डिझाइनरच्या ब्राइडल आउटलेटला बॉडी शेमिंगवरुन चांगलेच फटकारले आहे. तान्या हिने असे म्हटले आहे की, जेव्हा ती लग्नासाठी लहंगा खरेदी करण्यासाठी गेली असता तिला तिच्या वजनावरुन बॉडी शेमिंग करण्यात आले. तिने पुढे असे ही म्हटले, जेव्हा मी 12 वर्षांची होती तेव्हाच ठरवले होते की स्वत:च्या लग्नात तरुण तहिलियानी याचे कपडे घालीन. पण आता मी तेथे कधीच जाणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Tanaya | Millennial Doctor (@dr_cuterus)

त्यानंतर तान्या हिने आपल्या लग्नात अनिता डोंगरे हिने डिझाइन केलेला लाल रंगाचा लहंगा घातला. या कपड्यांवरुन तिचे कौतुक करण्यात आले. तसेच तान्या खुपच सुंदर दिसत होती. तान्या हिने वेडिंग ड्रेससाठी आधी तरुण याच्या स्टोरमध्ये विचारले होते. मात्र तिला उत्तम प्रतिसाद मिळाला नसल्याने ती नाराज झाली. तर तान्या हिची पोस्ट वेगाने सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामुळे तरुण याने माफी मागितली आहे.

तरुण याने आपल्या बाजूने स्पष्टीकरण देत असे म्हटले की. लिमिटेड स्टॉक असल्याच्या कारणास्तव नवरीच्या साइजचे कपडे त्यांच्या स्टोअरमध्ये त्यावेळी उपलब्ध नव्हते. तसेच त्यांचा एक खास दर्जा असून ते मेंटेन करतात. त्यामुळेच 3 आठवड्यांच्या कमी वेळात एक डिझाइन पुन्हा तयार करणे संभव नव्हते. पोस्टमध्ये असा ही तरुणने दावा केला की, तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिने काहीच उत्तर दिले नाही.