Fact Check: 'प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता' योजनेअंतर्गत तरुण बेरोजगारांना दर महिन्याला मिळणार 3500 रुपये? जाणून घ्या सत्य
पीआयबी फॅक्ट चेकने यामागील सत्याचा उलघडा केला आहे.
कोविड-19 संकट काळात (Covid-19 Pandemic) व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजमध्ये (Fake News) दिवसागणित भर पडत आहे. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात 'प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता' (Pradhan Mantri Berojgaar Bhatta) योजनेअंतर्गत तरुण बेरोजगारांना दर महिन्याला 3500 रुपये मिळणार असे म्हटले आहे. यासाठी प्री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी मेसेजमध्ये एक लिंकही देण्यात आली आहे. तसंच रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 27 मे असून लिंकवर क्लिक करुन रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रजिस्ट्रेशनसाठी कोणतेही शुल्क नसून 10 वी पास असलेल्या 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना याचा लाभ घेता येणार असल्याचेही यात म्हटले आहे. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) यामागील सत्याचा उलघडा केला आहे.
हा दावा खोटा असून फसणुकीचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशा कोणत्याही फेक वेबसाईटवर खाजगी माहिती देऊ नका, असं पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर एसएमएस, ईमेल किंवा इतर सोशल मीडिया माध्यमातून देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक न करु नका. अशा प्रकारच्या खोट्या लिंक्सद्वारे फ्रॉडर्स फसणुकीचा प्रयत्न करतात, असा सावधानतेचा संदेशही पीआयबीकडून देण्यात आला आहे. (Fact Check: कोरोना संकटकाळात WHO कडून दिले जात आहेत रोख पैसे? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसेजमागील सत्य)
Fact Check By PIB:
सरकार आणि सरकारी यंत्रणांकडून वारंवार फेक न्यूजबद्दल नागरिकांना सतर्क केले जाते. त्यामुळे फसवणूक, दिशाभूल टाळायची असल्यास सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही मेसेजवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मेसेजमागील सत्य जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.