IPL Auction 2025 Live

Fact Check: कोरोना व्हायरसविरूद्ध लढाईत PM-CARES मध्ये दान करण्यास सांगणारा मेसेज बनावट, PIB ने शेअर योग्य UPI-ID

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आणीबाणीच्या परिस्थितीत मदत निधी दरम्यान बनावट यूपीआय आयडीपासून देणगीदारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

पीआयबीकडून लोकांना बनावट UPI-ID द्वारे PM-CARES पैसे देण्यापासून सावध राहण्याचे आवाहन

कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लढा देण्यासाठी आपले आर्थिक योगदान योग्य ठिकाणी जात असल्याचे सुनिश्चित करण्याचे भारत (India) सरकारकडून आवाहन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या आणीबाणीच्या परिस्थितीत मदत निधी दरम्यान बनावट यूपीआय आयडीपासून देणगीदारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोना व्हायरसच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नरेंद्र मोदींनी एक समर्पित राष्ट्रीय निधी मिळावा म्हणून पीएम केयरची (PM-CARES) स्थापना केली. याच्या दुसर्‍याच दिवशी बनावट यूपीआय आयडी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान-केअर दानला हातभार लावण्याऐवजी फसवणूक करणारे लोकं बनावट यूपीआय आयडी व्हायरल करत लोकांची फसवणूक करण्यात लागले आहे. असाच एक संदेश सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. (Coronavirus विरुद्ध लढाईत आर्थिक मदत करण्यासाठी PM Cares Fund मध्ये द्या योगदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन)

रविवारी प्रेस माहिती ब्युरोने (पीआयबी) लोकांना अशा संदेशापासून सावध रहायला सांगितले आहे. पीआयबी ट्वीटमध्ये फॅक्ट चेकद्वारे नमूद केले आहे की पीएम केअर फंडाच्या बहाण्याने बनावट यूपीआय आयडी शेअर केले जात आहेत. यानंतर पीएमबीने शनिवारी पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या आपत्कालीन निधीसाठी देणगी देण्यासाठी योग्य यूपीआय आयडी देखील ट्विट केला. योग्य यूपीआय आयडी आहे - pmcares@sbi. पीआयबी ट्विटद्वारे फॅक्ट चेक केले की, “पंतप्रधान केअर फंड्सच्या बहाण्याने बनावट यूपीआय आयडीपासून सावध रहा.

केंद्राने 28 मार्च रोजी पंतप्रधानांचे नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थिती निधीत मदत (पीएम-केअर्स) ची स्थापना केली. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान-केअरमध्ये उदारपणे योगदान देण्याचे आवाहन केले. हा निधी सूक्ष्म देणगी देखील असू शकतो. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये खाते क्रमांक, आयएफएससी, स्विफ्ट कोड आणि देणग्यांच्या यूपीआय आयडीचादेखील उल्लेख केला. भारतात कोरोना व्हायरस प्रकरणाची संख्या आतापर्यंत 1024 वर पोचली असून 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

अशा बनावट संदेशांवर विश्वास ठेवू नका असा LatestLY लोकांना आवाहन करते. पंतप्रधानांनी नमूद केलेल्या यूपीआय आयडीद्वारे लोकांनी पंतप्रधान-केअरला देणगी दिली पाहिजे आणि कोरोना व्हायरसचा उद्रेक थांबवण्यासाठी सरकारला मदत करावी.