Fact Check: 'कोरोनाची लस घेतलेल्या लोकांना सरकार देत आहे 5000 रुपये', जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य

अशा प्रकारचे खोटे संदेश पाठवून लोकांकडून नोंदणी करून घेतली जाते व त्याद्वारे त्यांची वैयक्तिक माहिती गोळा केली जाते. या माहितीद्वारे तुमच्यासोबत फसवणूकही होऊ शकते. अशा संदेशांपासून नेहमी सावध राहा, असे पीआयबीचे म्हणणे आहे.

Fake News (Photo Credits: File Image)

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात बातम्या व्हायरल (Viral News) व्हायला वेळ लागत नाही. लोक जवळजवळ प्रत्येक बातमी आणि व्हिडिओ त्यामागील सत्य समजून न घेता शेअर करू लागले आहेत. अशाप्रकारे व्हॉट्सअॅपवर खोट्या बातम्यांचा पूर आला आहे. सध्या तुम्ही असाच एक मेसेज पाहिला असेल ज्यामध्ये दावा केला जात आहे की, ज्या लोकांना कोविडची लस (Covid-19 Vaccine) मिळाली आहे त्यांना पंतप्रधानांच्या कल्याण विभागाकडून ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर 5,000 रुपये दिले जात आहेत. आजकाल हा मेसेज व्हायरल होऊ लागला आहे.

या व्हायरल मेसेजमध्ये एक लिंकही शेअर करण्यात आली आहे. यावर जाऊन लोकांना आपली माहिती द्यावी व त्यानंतर त्यांना 5 हजार मिळतील, असे यामध्ये नमूद केले आहे. त्यासाठी 30 जुलै 2022 ची मुदत देण्यात आली आहे.

आता पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजची तपासणी केली असता हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे आढळून आले. हा मेसेज पुढे फॉरवर्ड करू नका, असे आवाहन त्यांनी सर्वसामान्यांना केले आहे. अशा खोट्या दाव्यांमधून लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याचे काम केले जात आहे. तर असा मेसेज तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला आला असेल तर तो फेक समजून डिलीट करा आणि कोणाशीही शेअर करू नका. (हेही वाचा: Fact Check: टोल प्लाझावर 'या' लोकांना भरावा लागणार नाही कोणताही कर, व्हायरल होत आहे मेसेज, जाणून घ्या सत्य)

दरम्यान, अशा प्रकारचे खोटे संदेश पाठवून लोकांकडून नोंदणी करून घेतली जाते व त्याद्वारे त्यांची वैयक्तिक माहिती गोळा केली जाते. या माहितीद्वारे तुमच्यासोबत फसवणूकही होऊ शकते. अशा संदेशांपासून नेहमी सावध राहा, असे पीआयबीचे म्हणणे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement